खारेपाटण उपकेंद्रात ट्रान्स्फॉर्मर पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण उपकेंद्रात
ट्रान्स्फॉर्मर पेटला
खारेपाटण उपकेंद्रात ट्रान्स्फॉर्मर पेटला

खारेपाटण उपकेंद्रात ट्रान्स्फॉर्मर पेटला

sakal_logo
By

L51983
खारेपाटण ः येथे वीज उपकेंद्रात गुरुवारी लागलेली आग विझविताना कणकवली नगरपंचायती अग्निशमन यंत्रणेचे कर्मचारी. (छायाचित्र ः रमेश जामसंडेकर)

खारेपाटण उपकेंद्रात
ट्रान्स्फॉर्मर पेटला
मालवण, वैभववाडी, देवगड अंधारात

सकाळ वृत्तसेवा
खारेपाटण, ता. २२ ः येथील वीज उपकेंद्रात तेल गळतीमुळे एका ट्रान्स्फॉर्मरला आज आग लागली. आग क्षणात भडकली. त्यामुळे चार तालुक्‍यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन अग्निशमन बंबाच्या साह्याने आणि एक तासाच्या प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आहे. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. यात महापारेषण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झालेल्‍या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्‍न सुरू होते.
खारेपाटण वीज केंद्रातून संपूर्ण जिल्ह्याला वीजपुरवठा होतो. या केंद्रातील एका २२० केव्हीच्या वीज उपकेंद्रातून कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्‍यांना वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील एका वीज ट्रान्स्फॉर्मरला अचानक आग लागली. तेल गळतीमुळे आग लागल्‍याची शक्‍यता उपकेंद्रातील सहायक अभियंता किशोर मेढेकर यांनी व्यक्त दिली. महावितरण आणि महापारेषण विभागातील कर्मचाऱ्यांनी वाळू, आग विझवण्याचे सिलिंडर वापरून आग विझवण्याचा प्रयत्‍न केला; मात्र आगीने मोठा भडका घेतल्‍याने हे प्रयत्‍न अपयशी ठरले. यानंतर तातडीने कणकवली आणि राजापूर पालिकांच्या अग्निशमन बंबांना बोलाविण्यात आले. मुख्य वीज केंद्राकडे जाणारा पुरवठादेखील खंडित करण्यात आला.
कणकवली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब सायंकाळी साडेपाचला घटनास्थळी दाखल झाला. यात आग काही प्रमाणात आटोक्‍यात आली. राजापूर पालिकेचाही बंब आला. त्‍यामुळे आगीवर लगेच नियंत्रण मिळवता आले. आगीचे वृत्त समजताच खारेपाटण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उपकेंद्र परिसरात धाव घेतली होती. आगीच्या धुराचे लोट दहा किलोमीटर परिसरातून दिसून येत होते. त्‍यामुळे वीज उपकेंद्र परिसरात नागरिकांची गर्दी वाढत होती. यात रक्षिततेचा उपाय म्‍हणून नागरिकांना वीज उपकेंद्र परिसरात प्रवेश बंद केला होता.
आग लागल्‍याच्या घटनेनंतर वीज केंद्राकडे जाणारा वीजपुरवठा बंद करण्यात आला. यात कणकवली, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यांचा वीजपुरवठा बंद झाला. सायंकाळी सहा वाजता कणकवली तालुक्‍याचा वीजपुरवठा सुरळीत केला; मात्र देवगड, वैभववाडी आणि मालवण तालुका अंधारात राहिला आहे. रात्री उशिरापर्यंत या तीन तालुक्‍यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्‍न सुरू होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, तलाठी के. सिंगनाथ, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पोलिस चौकीचे उध्दव साबळे आदींनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

खारेपाटण येथील वीज उपकेंद्रातील आग नियंत्रणात आली आहे. आगीच्या कारणांचा शोध घेत आहोत. मालवण, देवगड, वैभववाडी तालुक्‍यांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत.
- बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98871 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..