दाभोळ- भ्रष्टाचारविरोधी सक्षम अधिकाऱ्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ- भ्रष्टाचारविरोधी सक्षम अधिकाऱ्याची गरज
दाभोळ- भ्रष्टाचारविरोधी सक्षम अधिकाऱ्याची गरज

दाभोळ- भ्रष्टाचारविरोधी सक्षम अधिकाऱ्याची गरज

sakal_logo
By

भ्रष्टाचारविरोधी सक्षम अधिकाऱ्याची गरज
मुख्याधिकाऱ्याची बदली रोखावी ; सखोल चौकशी व्हावी
दाभोळ, ता. २२ ः दापोली नगरपंचयतीमध्ये सत्ता मिळवताना शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीत दापोलीकरांना पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाने आश्वासन दिले होते. दापोली नगरपंचायतीमध्ये सत्ता आल्यास आम्ही संशयित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रशासनाची उत्तम प्रकारे साथ मिळाली. म्हणूनच आज नगरपंचायतीमध्ये आपण भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे एक टोक बाहेर काढू शकलो.
नगरपंचायतीची स्थापना होऊन सुमारे २० वर्षाहून अधिक कालखंड झाला. यामध्ये प्रदीर्घ काळ एकच कर्मचारी नगरपंचायतीचा आर्थिक व्यवहार सांभाळत होते. दापोली शहरामध्ये विविध चर्चा ऐकायला मिळत असल्याने हा संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र असे असताना २२ सष्टेंबरला अचानकपणे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांची खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून दापोलीतून बदली झाल्याचे आदेश आले आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय आम्हाला असून केंद्र व राज्य शासनाची भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याची संकल्पना असल्याने त्यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नये, अशी आमची मागणी असल्याचे स्वीकृत नगरसेवक गुजर यांनी सांगितले.
दरम्यात दापोली नगरपंचायतीमध्ये अनेक महिने कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्यासाठी पैसेच नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होत नव्हते. तसेच विकास कामांवरही याचा परिणाम झाला होता. नगरपंचायतीच्या विविध बॅंकामध्ये असलेल्या मुदत ठेवी मोडण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामध्ये या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी दापोलीकरांची मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98874 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..