मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन धोरण ठरवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन धोरण ठरवणार
मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन धोरण ठरवणार

मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन धोरण ठरवणार

sakal_logo
By

52001
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर सावंत, बाजूला भास्कर राणे, दिलीप घाडीगावकर, दिनेश तेली.

मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटन धोरण ठरवणार

सुधीर सावंत ः सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी लवकरच

कणकवली, ता.२३ : सिंधुदुर्गचे पर्यटन धोरण ठरविण्याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार असल्‍याची माहिती शिंदे गटाचे नेते आणि सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज दिली.
येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत भास्कर राणे, दिलीप घाडीगावकर, दिनेश तेली आदी उपस्थित होते.
श्री.सावंत म्‍हणाले, जिल्ह्याचे पर्यटन धोरण निश्‍चित करण्याबरोबरच आकारी पड, आंबोली चौकुळ येथील कबुलायतदार प्रश्न, अपूर्ण असलेले ताळंबा, नरडवे धरण प्रकल्प, वनसंज्ञा यासारखे प्रलंबित प्रश्न येत्या दोन वर्षात शिंदे सरकारच्या माध्यमातून सोडविण्याला आपले प्राधान्य असणार आहे.
ते म्हणाले, ‘‘आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्ष काम करत आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यावर सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवले. तेव्हा पासून शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत मदत केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेत त्यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आहे. त्यामुुळे माझ्या बरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच जोमाने आपण मिळून जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी भक्कम काम करू
ते म्हणाले गद्दार कोण आणि खरा कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील.’’ दरम्‍यान, शिंदे गट शिवसेनेत अनेकजण प्रवेश करणार आहेत लवकरच जिल्ह्याची कार्यकारिणी आम्ही घोषित करणार आहोत तसेच मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कणकवली कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती श्री.सावंत यांनी दिली.
--
अनेक उद्योग आणण्याची ताकद राज्यात
जगातले सर्व उद्योग आणण्याची ताकद महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात आहे. एखादा प्रकल्प बाहेर गेला म्हणून फरक पडत नाही. जिकडे फायदा तिकडे उद्योगपती जात असतात. पर्यटन विकास आणि गावागावांत उद्योग निर्माण करण्यावर आमचा भर राहणार आहे. समृद्ध आणि आनंदी गावाचा प्रकल्प सिंधुदुर्गात आम्ही राबवत आहोत यात सर्व लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98924 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..