पणदूर येथील शाळेला दिली मंत्री दीपक केसरकरांनी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पणदूर येथील शाळेला दिली 
मंत्री दीपक केसरकरांनी भेट
पणदूर येथील शाळेला दिली मंत्री दीपक केसरकरांनी भेट

पणदूर येथील शाळेला दिली मंत्री दीपक केसरकरांनी भेट

sakal_logo
By

५२०४२
पणदूर ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत करताना संबंधित.

पणदूर येथील शाळेला दिली
मंत्री दीपक केसरकरांनी भेट
कुडाळ ः जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित हिंदी शिक्षक संमेलन आणि आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार वितरण या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठ प्रशालेला भेट दिली. यावेळी त्यांचे संस्था सचिव आपासाहेब गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, प्रशालेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
----------
५२०५१
जतीन पाटील, पार्थ सावंत

गणित संबोधमध्ये पाटील, सावंतचे यश
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने आयोजित शालेयस्तरीय गणित संबोध परीक्षेत इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पाचवीमधून पार्थ सावंत-भोसले याला १०० पैकी ९४ तर जतीन पाटील याला १०० पैकी ९२ गुण मिळवून प्रथम श्रेणी प्राप्त केली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
--
तृतीयपंथीयांबाबत जनजागृती
मालवण ः राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सप्ताहाच्या अनुषंगाने समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठा समतादूतांमार्फत तृतीयपंथीय व्यक्तींचे सर्वेक्षण व नोंदणीसाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत बार्टीचे सिंधुदुर्ग प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सगुण जाधव, सुदीप कांबळे, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, श्यामल सावंत, राजू दीनदयाळ, एस. एस. कासले आदींनी बसस्थानक, बाजारपेठा येथे तृतीयपंथीय व्यक्तींच्या नोंदणीसाठी जनजागृती कार्यक्रम राबविला.
--
बॅडमिंटन संघात श्रुती फणसेची निवड
रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या बॅडमिंटन स्पर्धा चार विभागात घेण्यात आल्या. या विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय वुमेन्स बॅडमिंटन स्पर्धा देवरूख येथील एपीएस महाविद्यालयामध्ये झाल्या. या स्पर्धेमध्ये नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा महिला संघ कोकण विभागात सर्वोत्कृष्ट ठरला. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून १३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. या वेळी हेगशेट्ये महाविद्यालय महिला संघाने देवरूख, पिल्लई आणि ज्ञानदीप खेड संघांना हरवत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरीत कुडाळ कॉलेजविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी करत हेगशेट्ये महाविद्यालयातील श्रुती फणसे, सायली चव्हाण, मैथिली सावंत आणि श्रावणी कांबळे यांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. फणसे हिची निवड मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी करण्यात आली.
--------------
बांबू लागवड कार्यशाळा
साडवली ः चिपळूण वनविभागामार्फत जागतिक बांबूदिनानिमित्त वनपरिक्षेत्र रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कबनूरकर हॉलमध्ये विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड व उपयोग कार्यशाळा झाली. कार्यशाळेला माजी सभापती जया माने, प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी, बांबू सोसायटी अध्यक्ष काका कोलते, सरपंच बापू शेट्ये, विनायक गोवरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, रामभाऊ आंब्रे, वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे आदी उपस्थित होते. बांबूरोपांचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन कार्यशाळेला सुरवात करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98975 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..