राष्ट्रभाषेचा सन्मान प्रत्येकाची जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रभाषेचा सन्मान प्रत्येकाची जबाबदारी
राष्ट्रभाषेचा सन्मान प्रत्येकाची जबाबदारी

राष्ट्रभाषेचा सन्मान प्रत्येकाची जबाबदारी

sakal_logo
By

52044
कट्टा ः येथे प्रशालेत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी.

राष्ट्रभाषेचा सन्मान प्रत्येकाची जबाबदारी

प्रशांत नाईक ः कट्टा महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात

बांदा, ता. २३ ः हिंदी भाषा ही संपर्क भाषा म्हणून कार्य करते. राजभाषा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्याइतपत समर्थ असून हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे वक्तव्य मुंबई पोर्ट ट्रस्टचे लेखाधिकारी प्रशांत नाईक यांनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे केले.
हिंदी दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक या नात्याने श्री. नाईक बोलत होते. यावेळी हिंदी दिनाची माहिती देत असताना भारतीय संविधानाची आणि संविधानातील तरतुदी आणि संविधानामध्ये भाषेबद्दल असणाऱ्या कलमांचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी या नात्याने मालवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी हिंदी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना, संपर्क भाषा म्हणून हिंदीचे देशामधील स्थान किती महत्त्वाचे आहे. याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना उदबोधन केले. नाईक यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी बँक ऑफ महाराष्ट्रच्या श्रीमती दुर्गाकणी यांचा सत्कार संस्थेच्या सचिव श्रीमती देसाई यांनी केला. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कट्टाचे अमोल चव्हाण यांचा सत्कार स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर यांनी केला. नाईक यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक नाईक यांनी केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित स्कूल कमिटी अध्यक्ष कट्टा नंबर १ गणेश वाईरकर, श्री. पावसकर यांचाही हिंदी विभागातर्फे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक नाईक यांनी प्रशालेमध्ये चाललेल्या हिंदी विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदीचे कार्य करणारी आपली एकमेव शाळा असून निश्चितच हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असे सांगितले. आपल्या प्रशालेतील हिंदी विभाग प्रमुख बी. एम. वाजंत्री तसेच आर. ए. सावंत, जे. एन. कानूरकर या सर्व सदस्यांना प्रोत्साहन दिले. नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वाना शुभेच्छा दिल्या व हिंदी उपक्रमाबद्दल गौरवद्वार काढले. हिंदी अध्यापक समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल व विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या चाललेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले. उपक्रमातून मिळणाऱ्या ज्ञानाची विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी असे आवाहन केले. वाजंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सावंत यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98977 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..