टीबी रुग्णांना चांगल्या आहाराची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीबी रुग्णांना चांगल्या आहाराची गरज
टीबी रुग्णांना चांगल्या आहाराची गरज

टीबी रुग्णांना चांगल्या आहाराची गरज

sakal_logo
By

52045
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ. हर्षल जाधव. सोबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सौदी.


टीबी रुग्णांना पोषक आहाराची गरज

डॉ. हर्षल जाधव ः ‘कम्युनिटी सपोर्ट’ योजनेला सहकार्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः टीबी झालेल्या रुग्णांना चांगला आहार मिळण्याची गरज आहे. यासाठी शासनाने ‘कम्युनिटी सपोर्ट टू टीबी रुग्ण’ ही योजना अंमलात आणली आहे. यातून ‘नि-क्षय मित्र’, हे अॅप तयार केले असून याद्वारे आहाराची गरज असलेल्या रुग्णांना समाजातील दानशूर व्यक्तींनी दत्तक घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जाधव यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत सौदी, किशोर लाड आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘‘केंद्राने टीबी निर्मुलनसाठी रुग्णांना सहाय्य करण्याचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान यासाठी राबविण्यात येत आहे. त्याद्वारे २०१५ मध्ये असलेल्या रुग्णांच्या तुलनेत २०२५ मध्ये ८० टक्के रुग्ण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टीबी आजार झालेल्या रुग्णांना शासन मोफत उपचार करत आहे. मोफत औषधे दिली जातात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला ५०० रुपये पैसे दिले जातात. यातून त्या रुग्णाला चांगला आहार मिळावा, असा शासनाचा उद्देश आहे. परंतु, या रुग्णांना कोरडा आहार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने नि-क्षय मित्र ही जन भागीदारी असलेली संकल्पना राबविण्यात सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्यासाठी पुढे यावे.’’
-----------
चौकट
३९३ रुग्णांना मदतीची गरज
जिल्ह्यात सध्या ५१० रुग्ण टीबी आजारावर उपचार घेत आहेत. यातील ३९३ रुग्णांनी आपल्याला मदतीची गरज असल्याची नोंद केली आहे. यातील कसाल येथील डॉ. प्रशांत कोलते यांनी पाच रुग्ण दत्तक घेतले आहेत. काही अधिकाऱ्यांनी सुद्धा रुग्ण दत्तक घेतले आहे. आतापर्यंत एकूण दहा रुग्ण दत्तक घेण्यात आले आहेत. त्यामुळे ३८३ रुग्ण दत्तक घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
------------
अशी करू शकता नोंदणी
टीबी आजार झालेल्या रुग्णांना आहार पुरविण्यास इच्छुक असलेल्या दानशूर व्यक्तींना नि-क्षय मित्र बनण्यासाठी प्रथम https://communitysupport.nikshay.in येथे लॉगिंग करावे लागणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान यावर क्लिक करून Ni-kshay Mitra Registration Form येथे आपण मदत करण्यास तयार असल्याची नोंद करायची आहे. अशाप्रकारे नि-क्षय मित्र बनण्यासाठी नोंदणी करावयाची आहे, असे यावेळी डॉ. जाधव यांनी सांगितले.
-----------
कोट
टीबी रुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी फॉरमॅट तयार आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ, गहू तर दीड किलो डाळ, २५० मिली तेल किंवा खोबरे आणि एक किलो शेंगदाणे हे धान्य प्रत्येक महिन्याला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने द्यायचे आहे. यासाठी महिन्याला सर्वसाधारण ५०० रुपये खर्च येतो. अशाप्रकारे सहा महिने आहार पुरवायचा असल्याने एकूण तीन हजार रुपये खर्च येतो. मात्र, ही मदत पैसे स्वरूपात रोख करायची नसून वस्तू स्वरूपात आहार पुरवावा.
- डॉ. हर्षल जाधव, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98978 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..