भक्तांच्या हाकेला धावणारी तुरंबची श्री शारदादेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्तांच्या हाकेला धावणारी तुरंबची श्री शारदादेवी
भक्तांच्या हाकेला धावणारी तुरंबची श्री शारदादेवी

भक्तांच्या हाकेला धावणारी तुरंबची श्री शारदादेवी

sakal_logo
By

at२३p५.jpg -
५२०४६
श्री शारदादेवी तुरंबव
-rat२३p६.jpg -
५२०४७
तुरंबव ः श्री शारदादेवी मंदिर.
---------------

भक्तांच्या हाकेला धावणारी तुरंबची श्री शारदादेवी

भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुका तुरंबव गावच्या श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (ता. २६) प्रारंभ होत आहे. श्री शारदा देवीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. तरुण पिढीला दांडिया, गरबा अशा नाचांची आवड असतानादेखील या नवरात्रौत्सवात शतकापासून सुरू असलेले पारंपरिक जाखडी नृत्य हे भाविकांचे एक मोठेच आकर्षण असते. नवरात्रीत देशभरासह परदेशातूनही हजारो भाविक येथे येतात. या निमित्ताने या जागृत श्री शारदादेवीची महती सांगणारा हा लेख.
- प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथून पश्चिमेकडे सुमारे १२ किलोमीटर अंतरावर तुरंबव या निसर्गरम्य गावी देवीचे मंदिर आहे. या मंदिरात श्री शारदा देवीबरोबरच श्री वरदान देवी, श्री मानाई देवी आणि श्री चंडिका देवी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. नवरात्रौत्सवात या देवींच्या रूप्याच्या मूर्तीबरोबरच गौराई देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या दहा दिवसात शारदोत्सव साजरा होतो.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या रूप्याच्या मूर्तीची व गौराई देवीची प्रतिष्ठापना करून या मूर्तींना वस्त्रालंकाराने शृंगारले जाते. पुढील ९ दिवस विजयादशमीपर्यंत हा साज तसाच ठेवला जातो. या कालावधीत मंदिरामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविकांची रिघ लागते. हे दर्शन रात्री ८ वाजेपर्यंत अविरत चालू असते. रात्री ९ वा. देवीची महाआरती होते व त्यानंतर जाखडी नृत्याला सुरवात होते. हे नृत्य धोतर नेसून आणि कमरेला शेला, डोक्यावर पेशवाई पगडी आणि पायात घुंगरू अशा थाटात ढोल व वाजंत्री यांच्या तालावर केले जाते. जाखडी नृत्य हा परंपरेने जोपासलेल्या लोककलेचा एक आविष्कार आहे व केवळ श्री शारदादेवीच्या या मंदिरातच पाहायला मिळतो. या नृत्यानंतर रात्री ११.३० वा. संततीविषयक नवस करणे, केलेले नवस फेडण्याचा कार्यक्रम होतो. ज्यांना संतती नाही असे भाविक राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून देवीला संततीसाठी साकडे घालण्याकरिता येतात. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी श्री शारदादेवी मंदिर न्यासाचे विश्वस्त मंडळ, सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ तत्पर असतात. दुरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तिनिवासात राहण्याची सोय आहे. उत्सव काळात एसटी महामंडळ ''चिपळूण-तुरंबव'' तसेच ''सावर्डे-तुरंबव'' या मार्गावर विशेष बसफेऱ्या चालू ठेवतात. रेल्वेने येणारे भाविक चिपळूण किंवा सावर्डे येथे उतरून तुरंबव येथे येऊ शकतात. विजयादशमीला संध्याकाळी मंदिरासमोरील प्रांगणात सामुदायिक सोने लुटण्याचा सोहळा होतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या पहाटे देवीसमोर बांधलेले नवधान्य सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटून या उत्सवाची सांगता होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99005 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..