नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

sakal_logo
By

52080
सावंतवाडी ः येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

काँग्रेसची मागणी; सावंतवाडीत तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून भात शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे शेती कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, अशी मागणी येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी श्री. पाटील यांना दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष राघू नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, संदीप सुकी, बाळा नमशी, राज पेडणेकर, संदीप गावडे, संजय लाड आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, नाले तुडुंब भरुन वाहत होते. ते पाणी शेतीमध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. तसेच बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाबरोबर कृषी विभागानेही नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळून देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सांगेलकर यांनी निवेदनातून दिला आहे. नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99013 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..