कुडाळात आज काँग्रेसची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात आज
काँग्रेसची बैठक
कुडाळात आज काँग्रेसची बैठक

कुडाळात आज काँग्रेसची बैठक

sakal_logo
By

कुडाळात आज
काँग्रेसची बैठक
कुडाळ ः जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पद्मश्री खासदार कुमार केतकर आणि अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता.२४) तीन वाजता कुडाळ येथे आयोजित केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.
--
मालवण येथे
पोस्टर स्पर्धा
मालवण ः येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे पर्यटन सप्ताहांतर्गत मराठी विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय खुली पोस्टर स्पर्धा २८ ला होणार आहे. स्पर्धा सकाळी ९ ते ११ या वेळेत ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी के. के. राबते, प्रा. एच. एम. चौगले यांच्याशी संपर्क साधावा.
------------------------
उसप ग्रामस्थांचे
उपोषण मागे
सावंतवाडी ः उसप येथे धान्य वितरण करण्यास ग्रामपंचायत इमारतीची जागा देऊनही तहसीलदार त्याठिकाणी परवानगी देत नसल्याने तेथील सरपंच व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी राजेंद्र निंबाळकर व सुनील गवस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेतले. सरपंच दिनेश नाईक, दीपक शेटकर, सुनील गवस, नीलेश नाईक व ग्रामस्थ उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने तब्बल दोन दिवस उपोषण सुरू होते. राजू निंबाळकर व सुनील गवस यांनी गुरुवारी उपोषणकर्त्यांना भेट देत चर्चा केली.
-------------------
रिक्षाचालकांची
२८ ला सभा
सावंतवाडी ः येथील सुंदरवाडी रिक्षाचालक-मालक सहकारी पतसंस्थेची २० बी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ ला सायंकाळी ४ वाजता पतसंस्था कार्यालय (उभाबाजार रघुनाथ मार्केट, बांदेकर बिल्डिंग) सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पतसंस्थेचे सर्व सभासद, कार्यकारिणी सदस्य, पिग्मी एजंट यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन श्यामसुंदर कुडबा नाईक यांनी केले आहे.
--
मालवण येथे
ध्यान शिबिर
मालवण ः गुरुतत्व, वैश्विक मंचातर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत अंबिका स्मृती बंगला, लायब्ररी शाळेनजीक, वायरी रोड येथे नि:शुल्क हिमालयीन समर्पण ध्यान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99018 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..