राजापूर-कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचा निर्धार
राजापूर-कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचा निर्धार

राजापूर-कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचा निर्धार

sakal_logo
By

rat23p17.jpg -
52085
राजापूरः देवाचेगोठणे येथील चुंबकीय विस्थापन दाखवणारे शिल्प पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात देवीहसोळ येथील भूमितीय संरचनेची शिल्पाकृती.
--------------
कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचा निर्धार
राजापुरात बैठक; पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा देणार
राजापूर, ता. २३ : जगभरामध्ये राजापूर तालुक्याची नवी ओळख निर्माण करून देणाऱ्या अश्मयुगीन काळातील मानवाच्या पाऊलखुणा अधोरेखित करणाऱ्या कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. या कातळशिल्पांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी त्या परिसरामध्ये आवश्यक असलेल्या विविध पायाभूत आणि अन्य सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने सर्वांगीण प्रयत्न करण्याचे आणि पुढाकार घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.
कातळशिल्पांच्या परिसरामध्ये पायाभूत सुविधा उभारण्या संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांनी केले. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य प्रशासकीय स्तरावर देण्याचे आश्‍वासित केले. पायाभूत सुविधा उभारण्यासह प्रस्ताव सादर करण्यासाठी निसर्गयात्री संस्थेचे आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्याचे त्यांनी सूचित केल्याचे निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड यांनी माहिती दिली. कातळशिल्पांचा समृध्द वारसा जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘कातळशिल्प संरक्षण संवर्धन आणि परिसर पर्यटन, विकास’ या विषयावर येथील पंचायत समितीमध्ये बैठक झाली. या वेळी जिल्हा जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मयुरी पाटील, कातळशिल्प संशोधक आणि निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, मकरंद केसरकर, सुहास गुर्जर, गटविकास अधिकारी सुहास पंडीत आदी उपस्थित होते.
श्री. रिसबुड यांनी कातळशिल्पांची सविस्तर माहिती देताना त्याच्यातून पर्यटनाद्वारे नेमकी कशी रोजगार निर्मिती करता येईल, त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधांची उभारणी करणे गरजेचे आहे, यासंबंधी सविस्तर माहिती दिली. कातळशिल्प परिसर विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्गयात्री संस्थेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासित केले.
-------------
चौकट
९ पैकी पाच ठिकाणे राजापुरातील
कोकणातील कातळशिल्प असलेल्या ९ ठिकाणांचा आज युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्राथमिक यादीत समावेश झाला आहे. यात राजापूर तालुक्यातील ५ ठिकाणे आहेत. जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये युनोस्कोने जिल्ह्यातील विशेषतः तालुक्यातील कातळशिल्पांच्या केलेल्या समावेशाने कातळशिल्पांचे महत्व अधोरेखित होत आहे. त्याद्वारे येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99021 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..