कलावैभव संस्थेतर्फे देवीच्या गीतांचा नजराणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलावैभव संस्थेतर्फे देवीच्या गीतांचा नजराणा
कलावैभव संस्थेतर्फे देवीच्या गीतांचा नजराणा

कलावैभव संस्थेतर्फे देवीच्या गीतांचा नजराणा

sakal_logo
By

कलावैभव संस्थेतर्फे
देवीच्या गीतांचा नजराणा
रत्नागिरी : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धावत येई भवानी हा भक्तीगीतांचा सुरेल नजराणा कलावैभव संस्थेतर्फे रसिकांना सादर करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीची एकाहून एक सरस गीते यानिमित्ताने रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या गीतांची संकल्पना, निर्मिती व निवेदन अनुया बाम यांचे असून संगीत दिग्दर्शन आकाशवाणीचे मान्यताप्राप्त रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार अवधूत बाम यांचे आहे. तर ही गीते प्रसिद्ध गायक नरेंद्र रानडे, मीरा सोवनी व स्वतः अवधूत बाम यांच्या सुरेल स्वरांत सजली आहेत. गीतकार जगदीश खेबुडकर, चिंतामणी भागवत, नितीन देशमुख, शैलेंद्र कानिटकर, श्रीकृष्ण लाटकर यांनी ही गीते लिहिली आहेत. या गीतांना तबला व ढोलकसाथ अभिषेक भालेकर, ध्वनीसंकलन वरद सोहनी यांनी केले आहे, मिक्सिंग-मास्टरिंग भैरी डिजिटल स्टुडिओचे मिलिंद गोवेकर यांनी केले आहे. विशेष सहाय्य स्वप्नील गोरे यांचे लाभले आहे. ही गाणी अवधूत बाम- कला वैभव युट्यूब चॅनल व फेसबुकवर २६ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांना ऐकायला उपलब्ध होणार आहेत. रसिकांनी या गीतांचा आनंद घेण्याचे आवाहन संगीतकार अवधूत बाम यांनी केले आहे.
-------
महाआवास उत्कृष्ट
लाभार्थ्यांचा सन्मान
खेड ः महाआवास अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद गट, ग्रामपंचायत व लाभार्थ्यांचा आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट जिल्हा परिषद गट म्हणून सुसेरी व अस्तान गटाला गौरवण्यात आले. आंबडस, मांडवे, धामणंद, धामणी, चोरवणे या ग्रामपंचायतींना उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट लाभार्थी म्हणून मधुकर दळवी, संतोष इनरकर, संजय कांबळे, राजेंद्र तांबे यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, विजय कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
------
अजिंक्य पवारची
राज्य संघात निवड
चिपळूण ः श्रमनिष्ठा सातत्य हे ब्रीदवाक्य असलेले न्यू हिंद विजय क्रीडामंडळ गेले ६० वर्षे सातत्याने नवनवीन खेळाडू घडवण्याचे काम करत आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान गुजरात येथे होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड झाली. या संघात न्यू हिंद विजय क्रीडामंडळाचा खेळाडू अजिंक्य पवार याची अंतिम १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार, राजेश शिंदे, मिलिंद पवार, योगेश हुंबरे व मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांनी अभिनंदन केले. ३६व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये उत्तम खेळ करून मंडळाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. हे मंडळ उत्तम व दर्जेदार खेळाडू घडावेत यासाठी कायम प्रयत्नशील असते. खेळाडूंसाठी नियमित सराव व शिबिरे घेतली जातात. खेळाडूंना मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन लाभते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99022 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..