रोजगार वाढवणे व विद्यार्थी गळती रोखण्याचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार वाढवणे व विद्यार्थी गळती रोखण्याचे उद्दिष्ट
रोजगार वाढवणे व विद्यार्थी गळती रोखण्याचे उद्दिष्ट

रोजगार वाढवणे व विद्यार्थी गळती रोखण्याचे उद्दिष्ट

sakal_logo
By

rat२३p११.jpg-
५२०५६
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण कार्यशाळेत सहभागी शिक्षक.
---------
रोजगार वाढवणे, विद्यार्थी
गळती रोखण्याचे उद्दिष्ट
माजी प्र कुलगुरू कुलकर्णी; गोगटेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणावर सेमिनार
रत्नागिरी, ता. २३ ः राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मार्फत २०३५ पर्यंत ग्रॉस एम्प्लॉयमेंट रेशो ५० टक्क्यावर न्यायचा आहे. पदवी शिक्षणात विद्यार्थी गळतीचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणणे हे ध्येय आहे. दहावीनंतर बारावी न करता सर्टिफिकेट ऑफ व्होकेशनल कोर्स, आयसिटी यांसारखे विविध पर्याय यात उपलब्ध होणार आहेत. रोजगाराच्यादृष्टीने व्होकेशनल स्टडीजला नवीन सिस्टममध्ये १२-१८ क्रेडिट्स अनिवार्य असणार आहेत. खेळ, सांस्कृतिक हे जादा अभ्यासक्रम न राहता ते आता पदवीचाच एक भाग होणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी यांनी सांगितले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिक्षक प्रशिक्षण समिती यांच्यातर्फे क्लस्टर महाविद्यालयातील शिक्षकांकरिता राष्ट्रीय शिक्षण धोरणावर सेमिनारमध्ये ते बोलत होते. त्यांनी कार्यक्रम कशा पद्धतीचे असतील, विद्यार्थ्यांना बकेट लिस्टमध्ये पर्याय कसे उपलब्ध होतील याबद्दल मार्गदर्शन केले. अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट या संकल्पनेबद्दल माहिती दिली.
या वेळी रत्नागिरी एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, सहसचिव प्रा. श्रीकांत दुदगीकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व प्रमुख व्याख्याते उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी केली.
एकूणच मसुदा तयार करण्यापासून तो प्रत्यक्षात आणण्यात वाटा असण्याऱ्या व्यक्तीकडून माहीत करून घ्यायला मिळल्याचे मत डॉ. विवेक भिडे यांनी मांडले. या कार्यक्रमाला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे ९२ शिक्षक व ८ क्लस्टर महाविद्यालयांचे २२ शिक्षक उपस्थित होते. विज्ञान विभाग उपप्राचर्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकांचे आभार मानले. काहीतरी नवीन घडताना चांगली गोष्ट हरवू शकते; पण त्याहूनही खूप चांगली गोष्टही आपल्याला मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99023 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..