मटका, जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटका, जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा
मटका, जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा

मटका, जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा

sakal_logo
By

52081
आशिष सुभेदार

मटका, जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करा

सावंतवाडीत मनसेची मागणी; अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा

सावंतवाडी, ता. २३ ः शहरासह तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा मनसेकडून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशारा सावंतवाडी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांची भेट घेण्यासाठी सोमवारी (ता.२६) मनसेचे नेते परशुराम उपरकर सावंतवाडीत येणार आहेत. त्यानंतर पुढील भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यात व शहरात गेले काही दिवस जुगार व मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. अशा तक्रारी काही ज्येष्ठीकडबव आल्या आहेत. त्यामुळे या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. नवनिर्वाचित पोलिस अधिकारी फुलचंद मेंगडे यांनी पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील काही दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना चाप बसला आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. यापुढेही त्यांनी असेच कारवाई सातत्य ठेवावे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी मनसेचे नेते उपरकर सोमवारी सावंतवाडीत येणार असून उपरकर उपविभागिय पोलिस अधिकारी सोळंके यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर नियोजन करून ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99024 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..