कोकण समुद्रकिनारी वैशिष्ट्यपूर्ण 303 जीवांच्या प्रजाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण समुद्रकिनारी वैशिष्ट्यपूर्ण 303 जीवांच्या प्रजाती
कोकण समुद्रकिनारी वैशिष्ट्यपूर्ण 303 जीवांच्या प्रजाती

कोकण समुद्रकिनारी वैशिष्ट्यपूर्ण 303 जीवांच्या प्रजाती

sakal_logo
By

rat२३p१५.jpg-
52083
संशोधनात कोकण किनारपट्टीवर सापडलेल्या विविध प्रजाती.
rat२३p२१.jpg
52089
रत्नागिरीः समुद्रकिनारी असलेले खळगे.
---------
कोकण समुद्रकिनारी वैशिष्ट्यपूर्ण ३०३ जीवांच्या प्रजाती
८ किनाऱ्यांवर अभ्यास; निसर्ग-पर्यटनासाठी कांदळवन कक्ष सज्ज
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः कोकण किनारपट्टी परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील टाइड पूल (खडकाळ खळगे) परिसरात ३०३ समुद्री जीवांच्या प्रजाती असल्याचे संशोधनातून समोर आले. निसर्ग पर्यटनाचा भाग म्हणून कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानतर्फे टाइड-पुलिंग उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे या तीन ठिकाणी कोस्टल टाइड पूल टुरिझम विकसित करण्याची संधी आहे. मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) या संस्थेला स्मॉल ग्रँट्स प्रोग्रामअंतर्गत निधी दिला होता. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागात रॉकी टाईड पूलच्या परिसंस्थेतील प्राणीसृष्टीचे दस्तावेजीकरण अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व गोल्डिन क्वाड्रोस, शिरीष मांची आणि सिद्धेश भावे यांनी केली आहे. समुद्रातील खडकाळ किनारी इंटरटायडल परिसरात (भरतीवेळी हा भाग पाण्याखाली जातो आणि ओहोटीला तो वर येतो तो भाग) विस्मयकारक रचना पाहायला मिळाली. हे रॉकी टाईड पूल अनेक समुद्री जीवांसाठी लघु अधिवास आहेत. इतर किनार्‍यांच्या तुलनेने खडकाळ किनार्‍यांवर सूक्ष्मजीवांची घनता सर्वाधिक असते आणि प्राणी व वनस्पतीच्या प्रजातींची उत्तम जैवविविधता आढळते. तेथे अनेक समुद्री जीव तात्पुरता आसरा घेतात, अन्नाचा स्रोत म्हणून त्यांचा वापर करतात. काही प्रजातींसाठी ही जागा पिल्लांसाठी उत्तम पोषण निवारा असते.
------------------
चौकट १
२८८ किमीवर समुद्री जीव

खडकाळ खळग्यात ३०३ समुद्री जीव आढळले. त्यात समुद्रशैवाल आणि अल्गी यांच्या ३० प्रजाती, वनस्पती प्लवकाच्या ८० प्रजाती, प्राणी प्लवकाच्या ७३ प्रजाती, डोळ्यांना दिसणारे प्राणी, दोन्ही पृष्ठवंशीय (सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे) व अपृष्ठवंशीय (कवचधारी, एकिनोडर्म, अ‍ॅनेलिड्स, अ‍ॅम्फिपॉड इत्यादी) यांत ८० प्रजाती, पक्ष्यांच्या ३० प्रजाती २८८ किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या कोकणातील किनारपट्टीवरील अभ्यासात आढळल्या आहेत.
-----------------
चौकट २
सर्वाधिक जैवविविधता वेळासमध्ये

संशोधकांनी किनारपट्टी भागातील ४५ खडकाळ भागांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासासाठी ५०० मीटरचा सलग खडकाळ किनारा असलेल्या २५ ठिकाणांची निवड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात अधिक संख्येने इंटरटायडल भाग आढळले. मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनपश्चात अशा तीन काळात हे सर्वेक्षण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक प्रजाती आहेत. कुणकेश्वरला सर्वाधिक तर गिर्ये घारी खळग्यांमध्ये सर्वात कमी विविधता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रजातींची सर्वाधिक जैवविविधता वेळासमध्ये (कासवांच्या गावात) आढळली असून किमान विविधता गावखडीत आहे.
--------------
चौकट ३
उत्पन्नाचा नवा पर्याय
वातावरणबदलाचे परिणाम अपरिहार्य असताना, या सगळ्याचा समुद्रातील जैवविविधतेचे नुकसान कमी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो. समुद्रातील काही भाग स्वच्छ करण्यासाठी जीव-उपचारात्मक उपयोग होऊ शकतो आणि स्थानिक मच्छीमारांना उत्पन्नाचा नवा पर्याय मिळेल.
----
कोट
खडकाळ खळग्यांची व्यवस्थित यादी करणे आणि या भागातील जैवविविधता निश्चित करणे, हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. या घटकांमुळे या भागात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. स्थानिक समुदायाला समाविष्ट करून आठ ठिकाणी उपक्रम सुरू करण्यासाठी मूल्यमापन सुरू आहे.
- विरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99027 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..