नवरात्रोत्सवात माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवात माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान
नवरात्रोत्सवात माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान

नवरात्रोत्सवात माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान

sakal_logo
By

नवरात्रोत्सवात माता सुरक्षित
घर सुरक्षित अभियान
सोमवारपासून सुरवात ; महिलांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी, ता. २३ ः सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी २६ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान जिल्हाभर राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी सांगितले.
हे अभियान जिल्हाभर राबवण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा झाली. या मोहिमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका, सेवक घरोघरी जाऊन शिबिरे व उपलब्ध सुविधेबाबत माहिती देतील. याची माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभा घेण्यात येणार आहेत. अभियान काळात दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान विविध कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त माता व इतर १८ वर्षांवरील महिलांच्या तपासणीचे आयोजन केले जाईल. मोहीम संपल्यावर चांगले काम करणाऱ्या संस्था व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात ही शिबिरे घेतली जातील. उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मातांची तपासणी, समुपदेशन हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. सोनोग्राफी शिबिरे आयोजित करून त्यात जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी होईल याचे नियोजन करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या महत्वाकांक्षी अभियानाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
-------
चौकट
कुटुंबकल्याणबाबत जागरुकता

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नवविवाहित जोडप्यांना व दोन अपत्य असणाऱ्या मातांना पाळणा लांबवण्याबाबत व दोन अपत्यांवरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99042 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..