बॅ. नाथ पै कोकणाला लाभलेले भूषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅ. नाथ पै कोकणाला लाभलेले भूषण
बॅ. नाथ पै कोकणाला लाभलेले भूषण

बॅ. नाथ पै कोकणाला लाभलेले भूषण

sakal_logo
By

52101
कुडाळ ः जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्‍घाटन करताना मधु मंगेश कर्णिक, प्रदीप ढवळ. शेजारी इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

बॅ. नाथ पै कोकणाला लाभलेले भूषण

मधु मंगेश कर्णिक ः कुडाळमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः सामान्यातील असामान्य माणूस, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून सामाजिकतेचा पिंड जोपासणारा साहित्यिक मनाचा राजकारणी माणूस म्हणजे बॅ. नाथ पै होय. बॅ. नाथ पै हे कोकणाला लाभलेले एक भूषण आहे, असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्‍घाटन श्री. कर्णिक यांच्या हस्ते झाले.
यावेळी कोकण मराठी साहित्य प्रदेशाचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, मंगेश मसके, वृंदा कांबळी, विठ्ठल कदम, भरत गावडे, अरुण मर्गज आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. कर्णिक म्हणाले, ‘‘युगनायक या शिर्षकाचा विचार करता खरोखरच एखाद्या युगामध्ये असणारा नायक त्याचे गुणवैशिष्ट्य असलेला एक महामानव म्हणजे नाथ पै होय. अतिशय कमी कालावधीत लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले बॅ. नाथ पै हे कोकणाला लाभलेले एक भूषण आहे. त्यांचा संवेदनशीलतेचा पिंड लक्षात घेता ते राजकारणात पडले नसते तर उत्तम साहित्यिक झाले असते. या सर्वाचे प्रत्यंतर उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी गाजवलेल्या कारकिर्दीमध्ये दिसून येते. माणसाला मोठेपणा मनाने दिलेला असतो; तो मनात जपलेला असतो आणि तोच मोठेपणा इतरांशी वागताना व्यक्त होत असतो. अशा प्रकारे मोठ्या मनाचा दिलदार समाजसेवक माजी खासदार म्हणजे बॅ. नाथ पै.’’
यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व नाथ पै यांच्या जीवनाचे पुस्तक भेट देऊन कर्णिक यांचा सत्कार झाला. कोमसापाचे कार्याध्यक्ष ढवळ यांनी कोणत्याही सुखसोयी नसताना स्व-कर्तृत्व आणि अभ्यासूपणाने मोठे झालेले बॅ. नाथ यांच्या संदर्भातल्या आठवणी कथन केल्या. चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अरुण मर्गज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेच्या केलेल्या सुंदर आयोजनाबाबत स्तुती केली. ‘बॅ. नाथ पै एक युगनायक’ विषयावर घेतलेल्या जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम प्रणिता पकोटकर, द्वितीय विराज आरोंदेकर, तृतीय सिद्धी मराठे तर मनोहर सरमळकर व मनाली कद्रेकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. दिपाली काजरेकर, प्रा. सुभाष गोवेकर, विठ्ठल कदम, भरत गावडे यांनी काम पाहिले. यावेळी स्नेहल फणसळकर, सौ. स्वाती सावंत, सुरेश पवार, प्रसाद कानडे, कल्पना भंडारी उपस्थित होते.
--
आठवणीने गलबलले
श्री. कर्णिक यांनी त्यांच्या संदर्भातल्या आठवणी उपस्थितांसमोर कथन केल्या. तेव्हा त्यांनाही त्यांच्या आठवणीने गलबलून आले. नाथ पै यांचे अकाली जाणे ही फार चटका लावणारी गोष्ट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी वक्तृत्व, कला ही कशी जोपायची असते? कशी सादर करायची असते? त्या बोलण्यामध्ये सांगण्याचा अर्थ असला पाहिजे तरच ते प्रभावी होते, अशा पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99046 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..