बाळासाठी पोषण आहार महत्त्वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाठी पोषण आहार महत्त्वाचा
बाळासाठी पोषण आहार महत्त्वाचा

बाळासाठी पोषण आहार महत्त्वाचा

sakal_logo
By

52105
फोंडाघाट : पोषण माह निमित्ताने येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात विहान फोंडेकर या सहा महिन्यांच्या बाळाचा प्रथम अन्नप्राशन समारंभ करताना मान्यवर.


बाळासाठी पोषण आहार महत्त्वाचा

अमोल पाटील : पोषण माह निमित्ताने फोंडाघाट येथे जनजागृती

कणकवली, ता.२३ : बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी पोषण आहार अत्‍यंत महत्‍वाचा आहे, असे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास अधिकारी अमोल पाटील यांनी केले. तालुक्‍यातील फोंडाघाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पोषण माह कार्यक्रम झाला. यात ते बोलत होते. श्री.पाटील म्‍हणाले, सप्टेंबर महिना हा सध्या पोषण माह म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. त् ‍याअनुषंगाने अंगणवाडी सेविकांनी प्रत्‍येक पालकांना पोषण आहाराचे महत्‍व समजावून द्यावे. तसेच बाळासाठी घरामध्ये आई जशी महत्त्वाची भूमिका बजावत असते, त्‍याचधर्तीवर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मुलांकडे लक्ष द्यावे. यातून मुलांचे पोषण उत्तम पद्धतीने होईल.
पोषण माह कार्यक्रमाच्या औचित्‍यावर फोंडाघाट येथे अंगणवाडी सेविकांनी प्रवेशद्वार ते सभागृह अशी पोषण आहार पालखी काढली. त्‍यानंतर प्रीती शिंदे आणि प्राची मराठे या गर्भवतींचा ओटी भरण कार्यक्रम विविध फळे, सकस कडधान्य, पालेभाज्या यांनी करण्यात आले. तर विहान फोंडेकर या सहा महिन्यांच्या बाळाचा प्रथम अन्नप्राशन समारंभ करण्यात आला. फोंडाघाट ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी सरपंच संतोष आग्रे आणि ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सावंत तर आभार प्रदर्शन वनिता मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसी सावंत, स्वाती रासम, प्रियंका कामतेकर, कविता सावंत, मनस्वी सावंत, सायली कदम, माया मेस्त्री, सुलभा लाड आदी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मेहनत घेतली.
--
चौकट
चिमुकली परी लक्षवेधी
सहा महिन्यानंतर बाळाला कोणते सकस अन्न आणि कसे द्यावे याचे मार्गदर्शन मातांना करण्यात आले. यावेळी विविध पोषक वनस्पतींनी सजलेली लावण्या येंडे ही चिमुकली पोषण परी देखील याठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी पर्यवेक्षिका उमा हळदवणेकर, आरोग्य सेविका मंदा राणे उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99055 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..