जिल्ह्यातील वीज पुरवठा पंधरा तासानंतर सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील वीज पुरवठा 
पंधरा तासानंतर सुरळीत
जिल्ह्यातील वीज पुरवठा पंधरा तासानंतर सुरळीत

जिल्ह्यातील वीज पुरवठा पंधरा तासानंतर सुरळीत

sakal_logo
By

जिल्ह्यातील वीज पुरवठा
पंधरा तासानंतर सुरळीत

खारेपाटण उपकेंद्रातील आगीचा फटका

कणकवली, ता.२३ : तालुक्‍यातील खारेपाटण येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरला काल (ता.२२) सायंकाळी पावणेपाचला आग लागली होती. तासाच्या प्रयत्‍नानंतर आग आटोक्‍यात आली; मात्र जिल्ह्यातील १ लाख २० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला होता. पंधरा तासाच्या अथक प्रयत्‍नानंतर आज सकाळी ७.१० ला सर्व वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूवर्वत झाल्‍याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
खारेपाटण येथील वीज उपकेंद्रातील आगीचा सर्वाधिक फटका मालवण, देवगड आणि वैभववाडीतील वीज ग्राहकांना बसला. या तीन तालुक्‍यातील अनेक ग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. खारेपाटण अतिउच्च दाब उपकेंद्राच्या आयसीटीत (इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर) तांत्रिक बिघाड होऊन ऑईलने पेट घेतल्याने आग लागल्‍याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या. त्यामुळे लगेच कणकवली, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍याचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यानंतर अर्ध्या तासात कणकवली तालुक्‍याचा वीज पुरवठा पूवर्वत झाला; मात्र कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, खारेपाटण आणि वैभववाडी या उपकेंद्रावरील ग्राहक अंधारात राहिले. आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी खारेपाटण उपकेंद्राचा वीजपुरवठा यशस्वीपणे पूर्ववत झाला. त्‍यामुळे या ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा प्रकाशमान झाले. दरम्यान, महावितरणच्या सहाय्याने वीजपुरवठ्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याचा खटाटोप सुरू होता. सिंधुदुर्गनगरी व ओरोस येथील जिल्हा केंद्राचा वीजपुरवठा अडीच ते तीन तासात तातडीची पर्यायी व्यवस्था करून पूर्ववत केला होता. त्यासाठी कणकवली अतिउच्च दाब उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेच्या एका पॉवर ट्रान्सफॉर्मरला ११० केव्ही राधानगरी अतिउच्च दाब उपकेंद्रावरून वीज पुरवठा केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99073 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..