तुरळमधील मनोरुग्ण महिलेला घेतले ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरळमधील मनोरुग्ण महिलेला घेतले ताब्यात
तुरळमधील मनोरुग्ण महिलेला घेतले ताब्यात

तुरळमधील मनोरुग्ण महिलेला घेतले ताब्यात

sakal_logo
By

मनोरुग्ण महिलेला
घेतले ताब्यात
संगमेश्वर, ता. २३ ः तालुक्यातील तुरळ परिसरात गेले आठ दिवस फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेस रिक्षा मालक-चालक संघटनेच्या माध्यमातून राजरत्न प्रतिष्ठानच्या ताब्यात देण्यात आले. या कामी संगमेश्वर पोलिसांचे सहकार्य लाभले.
तुरळ परिसरात गेले ८ दिवस एक ३२ वर्षीय मनोरुग्ण महिला फिरत होती. ही बाब रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब तत्काळ राजरत्न प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष रूपेश सावंत यांच्या कानावर घातली. सावंत यांनी तत्काळ आपले सहकारी राजरत्न प्रतिष्ठानचे सदस्य अनिरिद्ध (छोटू) खामकर, राही सावंत, कल्पना परीट यांच्यासह तत्काळ गोळवली टप्पा येथे येऊन या महिलेला संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, उपाध्यक्ष संदीप चिले, सदस्य आत्माराम मयेकर, राजेंद्र भोजने, शाहिद पांगारकर, तुषार कदम, महेश निवलेकर, अतिफ सुर्वे, भाजप चिटणीस अमित ताठरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99081 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..