अनधिकृत बॅनरवर पालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बॅनरवर पालिकेची कारवाई
अनधिकृत बॅनरवर पालिकेची कारवाई

अनधिकृत बॅनरवर पालिकेची कारवाई

sakal_logo
By

rat२३p२६.jpg
५२१२५
चिपळूण पालिकेने जप्त केलेले बॅनर.
-----------
अनधिकृत बॅनरवर पालिकेची कारवाई
चिपळुणात १०० फलक जप्त; नियमांचे सर्रास उल्लघंन
चिपळूण, ता. २३ः पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत १०० हून अधिक फलक व बॅनर जप्त केले आहे.
चिपळूण पालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य चौक आणि मुख्य मार्गावर अवैधरित्या फलक आणि बॅनर लावले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, नियमांचे सर्रास उल्लघंन केले जात आहे. या विरोधात पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीम आजपासून सुरू केली आहे. शहरातील विविध चौक आणि मुख्य मार्गालगत अवैधपणे लावलेले फलक, होर्डिंग व बॅनर हटवले जात आहेत. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख टोपरे यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली. त्यामुळे अवैध फलक लावणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे; मात्र पालिकेने या मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालिका तीन- चार दिवस ही मोहीम राबवून नंतर याकडे दुर्लक्ष करत असल्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा शहरवासीयांना आला आहे. त्यामुळे पालिकेला या माध्यमातून प्राप्त होणारा लाखो रुपयांचा महसूलदेखील बुडत असल्याचे चित्र आहे. पालिकेची परवानगी न घेता अवैधपणे फलक व बॅनर लावणाऱ्यांविरोधात जप्त व फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे; पण, पालिकेकडूनच याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या शुभेच्छा देणाऱ्या राजकीय तसेच व्यावसायिक जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. वास्तविक नेत्यांचे वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमाचे होर्डिंग व बॅनर लावताना पालिकेची परवानगी व शुल्क भरणे गरजेचे आहे; पण, कुणीही प्रक्रिया करत नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99082 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..