संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी
संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी

संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी

sakal_logo
By

rat23p12.jpg
L52057
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बोलताना मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे प्र संचालक डॉ. किशोर सुखटणकर.
------
संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना संधी
डॉ. किशोर सुखटणकर; गोगटेमध्ये आविष्कार संशोधन उपक्रम
रत्नागिरी, ता. २३ः संशोधन अभिवृत्तीतून विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या मिळणाऱ्या संधी, संशोधन लेख, संशोधन परिषदेतील सहभाग, संशोधन कॉपीराईट, पेटंट इथपर्यंत मोठ्या संधी आहेत. महाविद्यालयीन, विभागस्तर, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धा, संशोधनाच्या विविध पातळ्या आहेत. एखाद्या अभ्यास विषयाची प्रेरणा विद्यार्थ्यांना सर्वोच्च स्थानापर्यंत घेऊन जाऊ शकते. संशोधन अभिवृत्ती ही जीवनाच्या अनेक टप्प्यांकरिता उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठच्या चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपपरिसराचे प्र. संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.
येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आविष्कार संशोधन उपक्रमाविषयी डॉ. सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अविष्कार संशोधन उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेचे विविध टप्पे व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयी माहिती दिली. महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध असणारी संशोधन संसाधने विद्यार्थ्यांच्या विकासात योगदान देणारी असून महाविद्यालयाच्या संशोधनविषयक कामगिरीतून ते अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधनास अधिक सक्षम करण्याची महाविद्यालयाची भूमिका कायम असून महाविद्यालय त्यासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दिले. या संशोधन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संशोधन व संशोधन स्पर्धा या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. रामा सरतापे यांनी केले. अविष्कार संशोधन उपक्रम समन्वयक डॉ. मयूर देसाई, डॉ. भूषण ढाले, प्रा. सचिन सनगरे, उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99097 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..