स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

sakal_logo
By

rat२३p२३.jpg
५२१०७
गणपतीपुळेः स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला मिळालेला राज्यस्तरीय प्रथम दीपस्तंभ पुरस्कार मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वीकारताना अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. सोबत काकासाहेब कोयटे, डॉ. सोपान शिंदे आदी.
-----
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार
रत्नागिरी, ता. २३ ः महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय गटात प्रथम दीपस्तंभ पुरस्कार स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सलग आठव्या वर्षी प्राप्त झाला. गणपतीपुळे येथे हा कार्यक्रम झाला. १०० कोटी व त्यापुढील ठेवींच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वरूपानंद पतसंस्थेला प्राप्त झाला. अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना हा पुरस्कार उद्योगमंत्री उदय सामंत, फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने दोनदिवसीय कार्यशाळा, दीपस्तंभ पुरस्कार वितरण व वार्षिक सभा असे आयोजन रत्नागिरी येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे केले होते. राज्य फेडरेशनच्या या कार्यक्रमास राज्यभरातून ६०० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासवर्गात डॉ. शिंदे, फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तज्ज्ञ संचालक ॲड. दीपक पटवर्धन, सनदी लेखापाल विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शनपर सत्र घेतली.
कार्यक्रमात अॅड. पटवर्धन यांनी महाराष्ट्रातला ४० टक्के लोकसंख्येचा सहभाग आणि १ लाख कोटींच्या घरात ठेवी असलेली ही चळवळ अत्यंत प्रभावी आहे. या चळवळीचे महत्त्व मी जाणतो तसेच पतसंस्थांचा प्रभाव किती असतो याची जाणीव आपल्याला आहे, असे सांगितले.
कोकणात सहकार नाही, असे म्हणणाऱ्यांना ॲड. पटवर्धन यांनी स्वरूपानंद सहकारी संस्थेच्या माध्यमातून आदर्श काम उभं करत स्पष्ट उत्तर दिल आहे, असे सामंत म्हणाले. सहकारात राजकारण नाही. १०० टक्के अर्थकारण हाच फॉर्म्युला योग्य असल्याचे सामंत म्हणाले. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांनी ॲड. पटवर्धनांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेबद्दल गौरवद्गार काढले.
------------
चौकट
स्वरूपानंद पतसंस्थेची वाटचाल
स्वरूपानंद पतसंस्थेची वाटचाल देदिप्यमान आहे. २५९ कोटींच्या ठेवी, १६९ कोटींची कर्जे, ९९ टक्के वसुली, १३३ कोटींची गुंतवणूक, ३८ कोटींचा स्वनिधी, १७ शाखांच्या माध्यमातून ४० हजार सभासदांच्या सहभागाने चाललेले हे सातत्यपूर्ण अर्थचक्र आहे, असे सांगत पतसंस्थेला प्राप्त झालेल्या पुरस्काराबाबत अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया ॲड. दीपक पटवर्धन यांनी नोंदवली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99101 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..