बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक
बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक

बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक

sakal_logo
By

52148
शेर्ले ः रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे.

बांदा-शिरोडा मार्ग धोकादायक

खड्ड्यांचे साम्राज्य; ‘बांधकाम’ने लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले भागातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडले. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत मार्ग निर्धोक करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस ते शेर्ले दरम्यान अपघाती खड्ड्यांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून चालकांना वाहन चालवताना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. यात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मार्गावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज चुकुन अनेक अपघात झाले. अनेक वेळा खड्डे बुजविण्यात आले; परंतु, पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे उखडून जातो. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची डागडुजी करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांमधून होत आहे. रस्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत धरून चालावे लागते. ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्ड्यांमुळे वाहने वारंवार दुरूस्त करावी लागतात. संबंधित विभागाने याकडे अभ्यासपूर्वक लक्ष देत वारंवार निधी खर्ची न घालता एकदाच दर्जेदार काम करणे अपेक्षित असल्याचे प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99116 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..