अंबाबाई मंदिरातील ‘पेड’ दर्शन रांगेस स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिरातील 
‘पेड’ दर्शन रांगेस स्थगिती
अंबाबाई मंदिरातील ‘पेड’ दर्शन रांगेस स्थगिती

अंबाबाई मंदिरातील ‘पेड’ दर्शन रांगेस स्थगिती

sakal_logo
By

अंबाबाई मंदिरातील
‘पेड’ दर्शन रांगेस स्थगिती
सोमवारी न्यायालयात पुढील सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः यंदाच्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीने अंबाबाई मंदिरात दोनशे रुपये आकारून वेगळी व्हीआयपी पेड दर्शन रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असून, आज याबाबतची सुनावणी झाली. न्यायालयाने पेड दर्शन रांगेला सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहापर्यंत किंवा न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात श्री. मुनीश्वर यांनी दावा दाखल केला आहे. अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना शासनाने सात सप्टेंबर २०१० ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासाठीचा दावा १५ ऑक्टोबर २०१० रोजी मंजूर होऊन शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे स्वतंत्र रांग करता येणार नाही, असे श्री. मुनीश्वर यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे. याबाबत आज झालेल्या सुनावणीत देवस्थान समिती व जिल्हाधिकाऱ्यांनी मुदत मागितली. मात्र, त्याला हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला. सोमवारी (ता. २६) पुढील सुनावणी होणार असून ॲड. नरेंद्र गांधी, ॲड. ओमकार गांधी यांनी न्यायालयात बाजू मांडल्याचे श्री. मुनीश्वर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99126 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..