मालवणात बहुजनतर्फे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात बहुजनतर्फे प्रशिक्षण
मालवणात बहुजनतर्फे प्रशिक्षण

मालवणात बहुजनतर्फे प्रशिक्षण

sakal_logo
By

52167
वेंगुर्ले ः पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो.

अवैध दारु वाहतूक प्रकरणी
कोल्हापूरचा एक ताब्यात
वेंगुर्ले ः आडेली-वजराट येथे टेम्पोतून अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी कोल्हापूरच्या एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चालक युवराज दिलीप कुरणे (रा. कोल्हापूर, शिवाजी पेठ), असे संशयिताचे नाव आहे. तर दारूचे बॉक्स सापडलेला टेम्पोही (एमएच ०९ बिसी. ९८२८) जप्त करण्यात आला. ९१ हजार २०० रुपयांची दारू व २ लाखाच्या टेम्पोसह सुमारे ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल (ता.२२) रात्री पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्लेतील पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, कॉन्स्टेबल परशुराम सावंत, अमर कांडर, पांडुरंग खडपकर यांनी केली.
--
मालवणात बहुजनतर्फे प्रशिक्षण
मालवण ः महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पक्षाने ‘होऊ शकत आहे’ हा विषय घेऊन ‘शासनकर्ते बनो’ अभियानांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २६ सप्टेंबरला दुपारी दोनला कुंभारमाठ येथील जानकी हॉटेल सभागृह येथे आयोजित केले आहे. प्रशिक्षण शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बसपचे राष्ट्रीय महासचिव तथा राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र मुख्य प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह, प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजने, राज्य प्रभारी प्रा. प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र आयरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर व महासचिव आनंद धामापूरकर यांनी केले आहे.
-----------------------
नागपूर-मडगाव रेल्वेला मुदतवाढ
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर-मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक स्पेशल प्रवासी ट्रेनला मुदतवाढ दिली आहे. तसेच ट्रेनचे थांबे आणि वेळांमध्येही बदल केला आहे. नागपूर- मडगाव (०११३९) १ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दर बुधवारी, शनिवारी दुपारी ३.०५ ला नागपूर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-नागपूर (०११४०) २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दर गुरुवारी, रविवारी रात्री आठला मडगाव येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊला नागपूर येथे पोहोचेल. गाडीला वर्धा, धामणगाव, भंडारा, अकोला, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी, करमळी या स्थानकांवर थांबा आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99137 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..