कोल्हापूर कारागृहातील फरार कैदी रत्नागिरीत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर कारागृहातील फरार कैदी रत्नागिरीत अटक
कोल्हापूर कारागृहातील फरार कैदी रत्नागिरीत अटक

कोल्हापूर कारागृहातील फरार कैदी रत्नागिरीत अटक

sakal_logo
By

कोल्हापुरातील फरार कैद्याला अटक
तीन महिने फरार ; शहर पोलिसांची कुवारबावमध्ये कारवाई
रत्नागिरी, ता. २३ ः शहरात झालेल्या अभिजित पाटणकर खून प्रकरणातील कोल्हापूर कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगणारा कैदी पॅरोलवर सुटल्यानंतर ३ महिने फरार होता. शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कुवारबाव येथे त्या कैद्याला पकडून कोल्हापूर कारागृहाच्या स्वाधीन केले. कारागृहाचे नियम न पाळल्याने त्याची शिक्षा आणखी दोन वर्षे वाढणार आहे.
मोईन मोहम्मद युसुफ काझी असे त्या कैद्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. २२) कुवारबाव येथे शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी गणेश सावंत, प्रवीण बर्गे, आशिष भालेकर, अमोल भोसले व पंकज पडेलकर यांनी फिल्डिंग लावून त्याला पकडले. २०१५ ला रत्नागिरीतील अभिजित पाटणकर या तरुणाचा गोळ्या घालून खून झाला होता. या खुनातील गुन्हेगार मोईन मोहम्मद युसुफ काझी हा कोल्हापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आधी तो ३० दिवसाच्या संचित रजेवर कारागृहातून बाहेर आला. त्याला कोरोनाची ४५ दिवसाची रजा मिळाली होती. रजा संपल्यावर तो कारागृहात हजर झाला नाही. तीन महिने तो बाहेरच होता. त्यानंतर कोल्हापूर कारागृहाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विशेष कारागृहाने ११ जुलै २०२२ ला रत्नागिरी शहर पोलिसात काझी फरार असल्याची तक्रार दाखल केली.
रत्नागिरी पोलिस काझीचा शोध घेत होते. गुरुवारी तो कुवारबाव येथे येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कुवारबाव येथे त्याला पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99143 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..