तळेकांटेत कंटेनर उलटला, चालक बचावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेकांटेत कंटेनर उलटला, चालक बचावला
तळेकांटेत कंटेनर उलटला, चालक बचावला

तळेकांटेत कंटेनर उलटला, चालक बचावला

sakal_logo
By

rat23p29.jpg
52161
संगमेश्वरः तळेकांटे येथे अपघातग्रस्त कंटेनर.
------
तळेकांटेत कंटेनर उलटला,
चालक बचावला
रत्नागिरी, ता. २३ : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे शुक्रवारी (ता. २३) पहाटेच्या सुमारास कंटेनर दरीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने कंटेनर झाडाला अडकल्याने बावनदीत जाता जाता बचावला. चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनरमधून उडी मारल्याने तो बचावला. चालकाला झोप अनावर झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे असल्याचे समजते.
मुंबई-गोवा महामार्गावरून कंटेनर संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. तळेकांटे येथील गणेश मंदिराजवळ कंटेनर आला असता चालकाला झोप अनावर झाल्याने डुलकी लागली. यावेळी कंटेनर खालच्या बाजूला जाऊन दरीत कोसळला. मोठ्या झाडाला अडकल्याने तो बचावला. त्याने लगेचच कंटेनर मधून उडी मारली. सुदैवाने या दरम्याने समोर वाहन न आल्यामुळे तो डाव्या बाजूला घुसला. अन्यथा एखाद्या वाहनावर जोरदार आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अपघातानंतर सकाळच्या सुमारास वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यानंतर मात्र वाहतूक सुरू झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99162 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..