मालवणात पर्यटन व्यावसायिकांत बाचाबाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात पर्यटन व्यावसायिकांत बाचाबाची
मालवणात पर्यटन व्यावसायिकांत बाचाबाची

मालवणात पर्यटन व्यावसायिकांत बाचाबाची

sakal_logo
By

52184
मालवण ः अनधिकृत पर्यटन व्यावसायिकांवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी बंदर कार्यालयात जमलेले अधिकृत पर्यटन व्यावसायिक.

मालवणात पर्यटन व्यावसायिकांत बाचाबाची

अनधिकृत पर्यटनाबाबत आरोप; बंदर निरीक्षकांकडून आज बैठकीची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ ः येथील बंदर कार्यालयासमोरच बंदर अधिकाऱ्यांच्या समक्ष एक पर्यटन व्यावसायिक परराज्यातील बोट समुद्रात उतरवून अनधिकृतरित्या पर्यटन व्यवसाय सुरू करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही अधिकृत पर्यटन व्यावसायिक बंदर निरीक्षकांजवळ त्या बोटीवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गेले. यावेळी अधिकृत व अनधिकृत पर्यटन व्यावसायिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अखेर बंदर निरीक्षक आर. जे. पाटील यांनी जलक्रीडा प्रकाराबाबतची दर निश्चिती, कागदपत्रांची पूर्तता यासारख्या अनके समस्यासंदर्भात व पर्यटनात सुसूत्रता येण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यासाठी उद्या (ता.२४) पर्यटन व्यावसायिकांची बैठकीचे नियोजन करू, अशी ग्वाही दिली. त्यामुळे वादावर तात्पुरता पडदा पडला.
येथील बंदरात परराज्यातील बोटी आणून अनधिकृतरित्या पर्यटन व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे अनधिकृत व्यावसायीकांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात आज काही अधिकृत पर्यटन व्यावसायिकांनी बंदर निरीक्षक पाटील यांना घेराओ घातला. यावेळी अन्वेषा आचरेकर, मीनल परुळेकर, बाबा मोंडकर, रुपेश प्रभू, राजन परूळेकर, संतोष परब, मंगेश जावकर, मनोज मेथर, मनोज खोबरेकर, शंकर मुबंरकर आदी उपस्थित होते.
आरंभप्रमाणपत्र व इतर कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता संबंधिताने केली नसताना गेले दोन दिवस येथील बंदरात परराज्यातील बोटीमधून पर्यटकांना फिरवले जात आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? संबंधित बोट मालक बंदर विभागाच्या कार्यलयाला समोर बिनधास्तपणे अनधिकृतरित्या व्यवसाय करत असताना अधिकारी झोपी गेले का? असा प्रश्न करत बंदर विभाग डोळेझाकपणा करत असेल तर आम्ही वरिष्ठ कार्यालयाजवळ दाद मागू, असे पर्यटन व्यावसायिकांनी बंदर निरीक्षकांना सांगितले. यावर बंदर निरीक्षकांनी त्या बोट मालकाने आपली कागदपत्रे ऑनलाईन दाखल केल्याचे सांगितले. यावर संतप्त पर्यटन व्यावसायिकांनी ती कागदपत्र आम्हाला दाखवा अन्यथा ती बोट पाण्यातून बाहेर काढा, असा पवित्रा घेतला. बंदर कार्यालयात अधिकृत पर्यटन व्यावसायिक बंदर निरीक्षकांशी चर्चा करत असताना या ठिकाणी परराज्यातील बोट चालविणारा बोट मालक दाखल झाला. बंदरात अनेकजण अनधिकृतरित्या व्यवसाय करत असताना केवळ मलाच एकट्याला टार्गेट केले जात आहे. जोपर्यंत इतर अनधिकृत पर्यटन व्यावसायिकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही असे त्याने निरीक्षकांना सांगितले. यावर दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली.
----
अधिकाऱ्यांच्या साटेलोटेचा आरोप
अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यामुळे येथील जलक्रीडा व्यवसायावर अंकुश नाही. त्यामुळे हा व्यवसाय वाऱ्याप्रमाणे भरकटला आहे. जलक्रीडांबाबत दर निश्चिती होत नाही. याचा परिणाम २०० ते ३०० रुपयांमध्ये पर्यटकांना केवळ पाण्यात बुचकाळण्याचे काम काही अनधिकृत पर्यटन व्यवसायिक करत आहेत. यासाठी एक खिडकीखाली सर्व पर्यटन व्यावसायिकांना एकत्र करा बैठक घ्या, अशा सूचना करण्यात आल्या. यावर बंदर निरीक्षक श्री. पाटील यांनी उद्या यासंदर्भात पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99205 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..