समुद्रात तेल तवंग नष्ट करण्याचे प्रयत्न पोहचण्याची भिती कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्रात तेल तवंग नष्ट करण्याचे प्रयत्न

पोहचण्याची भिती कायम
समुद्रात तेल तवंग नष्ट करण्याचे प्रयत्न पोहचण्याची भिती कायम

समुद्रात तेल तवंग नष्ट करण्याचे प्रयत्न पोहचण्याची भिती कायम

sakal_logo
By

L52200
मालवण ः चिवला बिच किनाऱ्यावर शुक्रवारी आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात तेलाचे तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक झाले.

समुद्रात तेल तवंग नष्ट करण्याचे प्रयत्न
किनारपट्टीला धोका कायम; प्रतिबंधात्मक उपायांचे मालवणाला प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : तेलवाहू ‘पार्थ’ या अपघातग्रस्त जहाजातून सुरू झालेल्या तेल गळतीचा तवंग प्रवाहाबरोबर वाहत येऊन येथील किनारपट्टीला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता रत्नागिरी तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडर सचिन सिंग यांनी आज येथे व्यक्त केली. तेलाचा तवंग समुद्रात नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही तवंग किनारपट्टीवर पोहोचल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विजयदुर्ग ते देवगड ४० ते ४५ वाव खोल समुद्रात बुडालेल्या पार्थ जहाजातील तेल गळती सुरू झाल्याने तेल समुद्रकिनारी येण्याची शक्यता आहे. तेलाचे तवंग समुद्रामध्येच रोखण्यासाठी व किनाऱ्यावर आलेले तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक चिवला बीच समुद्रकिनारी रत्नागिरी तटरक्षक दलाचे कमांडर सिंग यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी प्रांत वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विजय यादव, मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. जी. मालवणकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यासह किनारपट्टी गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिसपाटील, सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. विजयदुर्ग ते देवगडदरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात ‘पार्थ’ १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाले आहे. रत्नागिरी तटरक्षक दलाकडून प्राप्त माहितीनुसार या जहाजातून हजारो लिटर तेल गळतीस १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या तेलाचे पाण्यामध्ये तयार झालेले गठ्ठे समुद्रकिनारी येण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून रत्नागिरी तटरक्षक दलाचे कमांडर सिंग यांना येथे आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी चिवला बिच किनाऱ्यावर आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखविले. आपत्ती पूर्व नियोजन व रंगीत तालीम शिबिर घेण्यात आले.

अफवांवर विश्वास ठेवू नका!
तेल गळती पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. उपाययोजना सुरू आहेत. ‘तेल गळतीमुळे मासे खाऊ नये’ अशा वा अन्य अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99214 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..