मायनिंगविरोधात आजगाव, धाकोरेत एकजुटीचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायनिंगविरोधात आजगाव,
धाकोरेत एकजुटीचा निर्धार
मायनिंगविरोधात आजगाव, धाकोरेत एकजुटीचा निर्धार

मायनिंगविरोधात आजगाव, धाकोरेत एकजुटीचा निर्धार

sakal_logo
By

52205
मळेवाड ः आजगाव, धाकोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मायनिंगच्या विरोधासाठी सहभागी ग्रामस्थ.

मायनिंगविरोधात आजगाव, धाकोरेत एकजुट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड तर वेंगुर्ले तालुक्यातील सोन्सुरे, आरवली, सखैलखोल, बांध या गावात मायनिंग करण्यासाठी मायनिंग पूर्वसर्वेक्षण करण्याचे ठरवले आहेत. त्यासाठी या ग्रामपंचायतींकडून सर्वेक्षण करण्यासाठी ''ना हरकत दाखला'' मागितला आहे. त्यासाठी कंपनीने या ग्रामपंचायतींना पत्र दिले होते. सोन्सुरे ग्रामपंचायतीने बोलावलेल्या ग्रामसभेत मायनिंग सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला न देण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी केला होता. तसाच ठराव आजगाव-धाकोरे ग्रामपंचायतीने आज बोलावलेल्या ग्रामसभेत एकमताने करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे हजेरी लावली होती. दोन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला ग्रामस्थाने उस्फूर्तपणे हजेरी लावत सर्वेक्षण करण्यासाठी ना हरकत दाखला कंपनीला न देण्याचा ठराव करताना या दोन्ही गावांमध्ये कंपनीला कोणत्याही परिस्थितीत मायनिंग करू दिले जाणार नसल्याचा निर्धारही करण्यात आला. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. ग्रामस्थांचा आजचा पवित्रा पाहता आजगावात मायनिंगला जोरदार विरोध असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99225 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..