विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

52212
सावंतवाडी ः सह्ययक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद यांच्याशी चर्चा करताना शिवसेना पदाधिकारी.


विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

महाविद्यालयाने फीसाठी हीन वागणूक दिल्याने कृत्य

सावंतवाडी,ता.२३ ः फीसाठी महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून हीन वागणूक मिळाल्याच्या नैराश्येतून तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार घरातील व्यक्तीच्या लक्षात आल्यामुळे त्याला छप्पराची कौले काढून वाचविले. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणाची चौकशी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका महाविद्यालयात हा विद्यार्थी दुसऱ्या वर्षासाठी शिक्षण घेत होता. त्याने काही महिन्यांपासून •फी भरली नव्हती. त्यामुळे संबधित महाविद्यालयच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने फीसाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच अर्वाच्य भाषा वापरून त्याला हीन वागणूक दिली जात होती. आज सकाळीही असा प्रकार घडला. यावेळी नैराश्येत युवकाने ‘‘आई- बाबा मला माफ करा,’’ अशी चिठ्ठी लिहून घरातील पडवीत साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चिठ्ठी दरवाजाला चिकटवली होती त्यामुळे घरातील व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आला. कौले काढुन त्याला वाचविले. या प्रकाराने भयभीत झालेल्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.
----
चौकट
शिवसेनेकडून दखल
याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली असून पोलिस ठाण्यात जाऊन संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ व बाळा गावडे यांनी केली. कारवाई न झाल्यास संस्थेला टाळे ठोकु, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y99243 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..