निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवा; मंत्री रवींद्र चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Chavan
निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवा

निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवा; मंत्री रवींद्र चव्हाण

सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये सावंतवाडी पालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. नुकतीच मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेतली. यावेळी सद्यस्थितीतील मतदारसंघांचा आढावा सादर केला. यावेळी सावंतवाडी पालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपला पोषक वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी शत-प्रतिशत भाजप हे उद्दिष्ट पुढे ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे, पक्ष संघटना मजबूत करावी, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या ठामपणे पाठीशी आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. सावंतवाडी शहर व तालुक्यातील विकासकामे तसेच खड्डेमय रस्त्यांसंदर्भात परब यांनी मंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधले. यावेळी चव्हाण यांनी सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी गावोगावी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. परब यांनी चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

कुडाळ मालवण निरीक्षकपदी परब
दरम्यान, परब यांनी माजी खासदार तथा भाजपचे युवा नेते नीलेश राणे यांची भेट घेत मालवण, कुडाळ विधानसभा मतदारसंघांविषयी आढावा दिला. परब यांची मालवण-कुडाळ मतदारसंघावर पक्ष निरीक्षक म्हणून निवड केली आहे. त्यानुषंगाने परब यांनी नुकतीच मुंबई येथे राणे यांची भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.