
स्पर्धा परीक्षांची चळवळ गावागावात पोहोचेल
फोटो ओळी
- rat24p16.jpg-KOP22L52304 रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाच्या डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात स्पर्धा परीक्षाकेंद्राचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत, प्रभारी कुलगुरू डॉ. दिंगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले.
स्पर्धा परीक्षांची चळवळ गावागावात पोहोचेल
उदय सामंत; जिल्ह्यात चांगले अधिकारी निर्माण करण्यास मदत
रत्नागिरी, ता. 2५ ः स्पर्धा परीक्षांची चळवळ गावागावात पोहोचावी आणि जिल्ह्यात चांगले अधिकारी तयार व्हावेत यासाठीच मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसरात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात स्पर्धा परीक्षाकेंद्राचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिंगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील त्याचबरोबर उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा चांगला उपयोग होईल, असे सामंत यांनी सांगितले.
या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी रत्नागिरीतील केंद्रासाठी लागणारी जी काही मदत लागेल ती तातडीने देण्यात येईल. या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही दिले.
प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केंद्रबाबत माहिती दिली. रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केंद्राची रचना याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन भाग्यश्री पावसकर हिने केले आणि साक्षी चाळकेने आभार मानले.