मुरुड किनारी आढळली निर्मनुष्य लाईफ बोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

life boat found off Murud coast
मुरुड किनारी आढळली निर्मनुष्य लाईफ बोट

मुरुड किनारी आढळली निर्मनुष्य लाईफ बोट

दाभोळ : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी शनिवारी एक निर्मनुष्य लाईफ बोट आढळून आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी शनिवारी सकाळी फेरफटका मारणाऱ्याना ही लाईफ बोट आढळून आली. त्यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. मात्र यावेळी भरती असल्याने त्यांना बोटीपर्यंत पोहोचता येते नव्हते. काही वेळाने पाणी कमी झाल्यावर या बोटीची तपासणी करण्यात आली.

या लाईफ बोटीमध्ये कोणीही व्यक्ती नव्हती बॅटरी व इतर समान आहे. शिवाय ही लाईफबोट एका बाजूने फुटलेली आहे. नुकतीच देवगड येथे एक तेल वाहून नौका बुडाल्याने त्या बोटीचा या बोटीशी संबंध असावा काय याबाबत तपास सुरू आहे. या घटनेचा दापोली पोलीस तपास करत आहेत. मात्र एवढी बोट समुद किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत सुरक्षा यंत्रणाना खबर लागली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.