रत्नागिरी-भविष्यातही आरडीसीसीचे नेतृत्व डॉ. चोरगेंकडेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-भविष्यातही आरडीसीसीचे नेतृत्व डॉ. चोरगेंकडेच
रत्नागिरी-भविष्यातही आरडीसीसीचे नेतृत्व डॉ. चोरगेंकडेच

रत्नागिरी-भविष्यातही आरडीसीसीचे नेतृत्व डॉ. चोरगेंकडेच

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat२५p९.jpg- २२L५२४१३
रत्नागिरी ः उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे.
------------
भविष्यातही आरडीसीसीचे नेतृत्व चोरगेंकडेच
उदय सामंत ः बँकेतर्फे उद्योगमंत्रीपद मिळाल्यानंतर सत्कार
रत्नागिरी, ता. २५ ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील पहिल्या दोन क्रमांकामधील बँक आहे. डॉ. ताजानाराव चोरगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बँकेने चांगली प्रगती केली आहे. बँकेचे कामकाज हे राजकारणविरहीत असून यापुढेही डॉ. चोरगे नेतृत्वाखाली बँक कार्यरत राहील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. सामंत यांची उद्योगमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा को-ऑप बँक्स् एम्प्लॉईज युनियनतर्फे जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र जयवंत साळवी यांनीही अभिनंदन केले.
या सत्कारावेळी मंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात नवनवीन उद्योगधंदे आणून, जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जरूर ते प्रयत्न करणार आहे. शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेतून जिल्ह्यातील तरूणांना उद्योजक म्हणून उभे करणार असून, त्याकरिता जिल्हा बँकेने जरूर ते सहकार्य करावे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील पहिल्या दोन क्रमांकामधील बँक असून, या बँकेमध्ये होणार्‍या कोणत्याही समारंभाला मला अगत्याने निमंत्रीत केले जाते. डॉ. चोरगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बँकेने चांगली प्रगती केली आहे. जिल्हा बँकेचे कामकाज हे राजकारणविरहीत आहे. त्यामुळे यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली बँक कार्यरत राहील.
तसेच बँकेचे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी जिल्ह्यात नवनवीन उद्योगधंदे आणून बेरोजगार तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले. ते म्हणाले, ‘बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत योगदान दिले जाईल. बँकेत कामकाज करताना उदय सामंत यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बँकेला सहकार्य केले होते. त्यांची जिल्हा बँकेबद्दल असलेली आस्था व आपुलकी यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.’ संचालक राजेंद्र सुर्वे, गजानन पाटील, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, अमजद बोरकर, दिनकर मोहिते, महेश खामकर, रामचंद्र गराटे, कर्मचारी प्रतिनिधी संचालक जितेंद्र साळवी व नरेश कदम, बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर आदी उपस्थित होते.