
‘ओंकार’तर्फे सावंतवाडीत गोंधळ, लावण्या, देखावे
‘ओंकार’तर्फे सावंतवाडीत
गोंधळ, लावण्या, देखावे
सावंतवाडी, ता. २५ ः येथील ओंकार कलामंचच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त यावर्षी खास दर्शकांसाठी महालक्ष्मी देखाव्यासह वारूळातील श्री स्वामी दर्शन व नरसिंह अवतार हा ट्रिक्ससीनयुक्त देखावा नृत्यातून सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी गोंधळ, लावण्या आणि विविध नृत्याचे कार्यक्रम सोबतच मनोरंजनाचीही पर्वणी असेल.
याबाबत ओंकार कलामंचाची बैठक नुकतीच अध्यक्ष अनिकेत आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अमोल टेंबकर, निवेदक शुभम धुरी, अभिषेक लाखे, किसन धोत्रे, नारायण पेंडूरकर, साईनाथ हनपाडे, विशाल तुळसकर, राहुल परब, ओम टेंबकर, जान्हवी सारंग, खुशी वेंगुर्लेकर, सहीता गावडे, पुजा राणे, सोनाली बरागडे, प्रणिता बरडे, पूजा जाधव आदी कलाकार उपस्थित होते. ओंकार कलामंचच्या माध्यमातून नृत्य दिग्दर्शक अनिकेत आसोलकर दरवर्षी नवरात्रीत सांस्कृतिक नजराणा घेऊन येत असतात. याच पार्श्वभूमीवर यावर्षी नव्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे महालक्ष्मी देखाव्यासह वारूळातील श्री स्वामी दर्शन व नरसिंह अवतार हा ट्रिक्स युक्त नृत्यातून सादर केला जाणारा देखावा प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे. विनोद वीरांच्या सोबत दर्शकांना हास्यकल्लोळही अनुभवता येणार आहे.