
‘भारत जोडो’चा प्रतिसाद बदलाची नांदी ः केतकर
52480
कुडाळ ः येथील बैठकीत डॉ. मयूर शारबिद्रे यांना नियुक्तीचे पत्र देताना खासदार कुमार केतकर. बाजूला डॉ. भालचंद्र मुणगेकर. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘भारत जोडो’चा प्रतिसाद
बदलाची नांदी ः केतकर
जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याची ग्वाही
कुडाळ, ता. २५ ः राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद हा राजकीय बदलाची नांदी आहे. आता लोकांना कळून चुकले आहे की काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक खासदार पद्मश्री केतकर आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु अर्थतज्ज्ञ माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झाली. यावेळी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश पातळीवरून जिल्हा काँग्रेसला बळ दिले जाईल, असे आश्वासन डॉ. मुणगेकर यानी दिले. डॉ. मयूर शारबिद्रे यांना माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी अध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी, कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, मिडीया विभाग जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरुणकर, ओबीसी विभाग महाराष्ट्र सचिव अमिदी मेस्त्री, कुडाळ नगराध्यक्ष आफ्रिन करोल, महिला बालकल्याण सभापती अक्षता खटावकर, जिल्हा बॅंक संचालक तथा मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी आदी उपस्थित होते.