
देवरूख- नवरात्रोत्सव विविध स्पर्धांनी होणार साजरा
साडवली सह्याद्रीनगरला
आजपासून नवरात्रोत्सव
देवरूख, ता. २५ ः साडवली-सह्याद्रीनगर मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव सोमवारपासून (ता. २६) सुरू होणार आहे. सुखदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दांडिया रास गरबा यासह दररोज विविध स्पर्धा होणार आहेत. सोमवारी सकाळी गजानन आशीर्वाद चित्रशाळेतून सचिन गुरव यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली दुर्गामातेची मूर्ती मिरवणुकीने आणली जाणार आहे. विधीवत पूजन करून ती स्थानापन्न होणार आहे. नवरात्रोत्सवात दांडिया रास गरब्यात तरुणाईची पावले थिरकणार आहेत. या ठिकाणी डोळे दीपवून टाकणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २७) सायं.५ वा. महिलांसाठी फनीगेम्स, २८ ला ६.३० वा. संगीता जाधव पुरस्कृत पाककला स्पर्धा,
२९ ला संध्या. ४ वाजल्यापासून हळदीकुंकू समारंभ, ३० ला सायंकाळी ६.३० वा. धमाल आणणारी होममिनिस्टर स्पर्धा रंगणार आहे. शनिवारी पानाफुलांचा भोंडला स्पर्धा होणार आहे. तसेच १ व २ ऑक्टोबरला कॅरम स्पर्धा, ३ ऑक्टोबरला रात्री ८ वा. फॅन्सी दांडिया स्पर्धा, ४ ला रात्री दांडिया रास गरबा झाल्यानंतर दुर्गामाता देवीचे मिरवणुकीने विसर्जन होणार आहे. नवरात्रोत्सवातील विविध स्पर्धांसाठी नावनोंदणी केली जाणार आहे. यासाठी मोहन कनावजे, अभिजित सुर्वे, भालचंद्र आखाडे, विराज भिंगार्डे, नीलेश वाडकर, मयूर खरात, अमेय लिमये, उदय नाखरेकर, संगीता जाधव यांच्याशी संपर्क साधावा.