Sun, Jan 29, 2023

रत्नागिरी-ऑफ्रोहचे आजपासून उपोषण
रत्नागिरी-ऑफ्रोहचे आजपासून उपोषण
Published on : 25 September 2022, 1:52 am
ऑफ्रोहचे आजपासून उपोषण
रत्नागिरी, ता. २५ ः अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य कर्मचार्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे सोमवारपासून (ता. २६) जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा माधुरी मेनकार, जिल्हाध्यक्षा उषा पारशे यांनी दिली. शासनाने २० सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनतर्फे महाराष्ट्रभर उपोषण करण्यात येणार असल्याची नोटीस १३ सप्टेंबरला दिली होती. कालपर्यंत शासनाने या निवेदनाची दखल घेतली नव्हती. विविध विभागातील सेवा समाप्त कर्मचार्यांना २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील ४.२ नुसार अजूनही अधिसंख्य पदाचे आदेश दिलेले नाहीत.