रत्नागिरी-अॅड. पटवर्धनांचा आरडीसीसी बॅंकेतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-अॅड. पटवर्धनांचा आरडीसीसी बॅंकेतर्फे सत्कार
रत्नागिरी-अॅड. पटवर्धनांचा आरडीसीसी बॅंकेतर्फे सत्कार

रत्नागिरी-अॅड. पटवर्धनांचा आरडीसीसी बॅंकेतर्फे सत्कार

sakal_logo
By

-rat25p12.jpg-KOP22L52417
रत्नागिरी ः स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे.
---------

अॅड. दिपक पटवर्धनांचा
आरडीसीसी बॅंकेतर्फे सत्कार

रत्नागिरी, ता. 25 ः स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सलग आठव्यांदा दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा जिल्हा बँकेतर्फे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनमार्फत दिला जाणारा 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता राज्यस्तरीय गटात प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ’ पुरस्कार सलग आठव्यांदा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभाला बँकेचे संचालक मंडळ सदस्य दिनकर मोहिते, रामचंद्र गराटे, महादेव सप्रे, राजेंद्र सुर्वे, संजय रेडीज, गजानन पाटील, अमजद बोरकर, मधुकर टिळेकर, कर्मचारी प्रतिनिधी संचालक जितेंद्र साळवी, बँकेचे कार्यकारी संचालक अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर आदी उपस्थित होते.