
रत्नागिरी-जाहिरातदार बातम्या
रेटिनातज्ञ डॉ. कामत उद्यापासून
इन्फिगो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध
रत्नागिरी, ता. २५: चेन्नई येथील शंकर नेत्रालयाचे उच्च प्रशिक्षित रेटिना सर्जन डॉ. प्रसाद कामत हे साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर हॉस्पीटल येथे उद्यापासून (ता. २७) रेटिना रुग्णांची तपासणी करणार आहेत. ते ३० सप्टेंबरपर्यंत चारही दिवस इन्फिगो हॉस्पिटलमध्ये रेटिनाशी संबंधित गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार, सल्ला, निदान व शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्ण दिवस उपलब्ध असणार आहेत.
डोळ्याच्या रेटिनाशी संबंधित सल्ला हवा असणाऱ्या रुग्णांनी इन्फिगो आय केयर हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. कामत यांनी आजपर्यंत मुंबई, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जबलपूर, पटना, रांची, अहमदाबाद, सुरत या शहरातील अनेक रुग्णांना सल्ला व सेवा दिली आहे. या संधीचा रत्नागिरीच्या रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगो तर्फे करण्यात आले आहे. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षातून दोन वेळेस रेटिना किंवा डोळ्यांच्या पडदयाच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडून डोळ्यांची व पडद्याची तपासणी करणे गरजेचे असते. आजार उशिरा लक्षात आल्याने दृष्टीचे नुकसान झालेले असते व उपचारांमध्ये गुंतागुंत उत्पन्न होते. त्यामुळे रुग्णांनी वेळेवर तपासणी करून दृष्टीनाश टाळावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे केले आहे.
-------
स्वरूपानंद पतसंस्थेची
दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना
रत्नागिरी, ता. २५ : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना जाहीर झाली असून सोमवारपासून (ता. २६) योजना चालू होऊन २६ ऑक्टोबरला सांगता होईल. या योजनेसाठी १२ ते १८ महिने मुदतीच्या ठेवीवर ६.५० टक्के, ज्येष्ठ नागरीक व महिला यांच्यासाठी ६.७५ टक्के व्याजदर संस्थेने घोषित केला आहे. १९ ते ६० महिने मुदतीच्या योजनेसाठी ६.७५ टक्के व ज्येष्ठ नागरीक व महिला ७.०० टक्के दर घोषित करण्यात आला आहे. दसरा दिवाळी या मंगलमय सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी पतसंस्था ठेव योजना प्रतिवर्षी जाहीर करते व ठेवीदार या ठेव योजनांना भरपूर प्रतिसाद देतात. संस्थेला सलग आठव्यांदा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे देण्यात येणारा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे संस्थेचा नावलौकिक राज्यस्तरावर अधिकच वाढलेला आहे. सद्यस्थितीत संस्थेच्या ठेवी २५९ कोटी ४८ लाख एवढ्या असून कर्जे १६८ कोटी ८९ लाख एवढे आहे. सर्व आर्थिक निकष पाळल्याने व व्यावसायिक दृष्टीकोनाची व सहकार तत्त्वांची सांगड घातल्याने संस्थेचे अर्थकारण योग्य गतीने वाढताना दिसत आहे. अधिकाधिक ठेवीदारांनी संस्थेच्या ठेव योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.