देवगडात आजपासून दांडियांची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात आजपासून दांडियांची धूम
देवगडात आजपासून दांडियांची धूम

देवगडात आजपासून दांडियांची धूम

sakal_logo
By

देवगडात आजपासून दांडियांची धूम

जय्यत तयारी; तब्बल दोन वर्षानंतर उत्साहाला उधाण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे आनंदापासून दूर राहिलेल्या तरूणाईला यंदा मुक्तपणे होणार्‍या नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. उद्यापासून (ता.२६) सर्वत्र दांडियाची धूम सुरू होणार असून याची तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. दरम्यान, विविध देवीच्या मंदिरात नवरोत्सव तयारी जोरात सुरू आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच सण, उत्सवावर मर्यादा होत्या. त्यामुळे उत्साह मावळला होता. सण, उत्सव गर्दीविना होत होते. मात्र, आता कारोनाचे सावट दूर झाल्याने उत्साहाला उधाण आले आहे. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीमय वातावरणात मुक्त वातावरणात पार पडला. आता तरूणाईला नवरोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी दांडिया उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. काही भागात देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा केला जातो. तर काही ठिकाणी केवळ गरबा खेळला जातो. प्रामुख्याने गुजराती समाजाची ओळख असलेल्या गरबाचे वेड अलीकडे येथील तरूणाईला लागले आहे. तालुक्यातील विविध ठिकाणच्या देवीच्या मंदिरात पारंपारिक पध्दतीने नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. उद्या घटस्थापना करून मंदिरातील उत्सवाला प्रारंभ होईल. यासाठी ठिकठिकाणची मंदिरे विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट करून सजवण्यात आली आहेत. उत्सव काळात देवीला भरजरी वस्त्रे आणि अलंकार घालून सजवले जाते. या काळात विविध भाविक ओटी भरण्यासाठी गर्दी करतात. तालुक्यातील कोटकामते येथील श्री भगवती मंदिरात पारंपारिक पध्दतीने उत्सव साजरा होणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जामसंडे येथील श्री दिर्बादेवी मंदिरात, साळशी येथील श्री पावणाईदेवी मंदिरात, मुणगे येथील श्री भगवती मंदिरात उत्सव साजरा होईल. दरम्यान, काही भागात तरूण मंडळाच्यावतीने उत्सव करण्याची तयारी सुरू होती.