रत्नागिरी-गॅस भरलेल्या टँकरच्या अपघाताने वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गॅस भरलेल्या टँकरच्या अपघाताने वाहतूक ठप्प
रत्नागिरी-गॅस भरलेल्या टँकरच्या अपघाताने वाहतूक ठप्प

रत्नागिरी-गॅस भरलेल्या टँकरच्या अपघाताने वाहतूक ठप्प

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat२५p३०.jpg- KOP२२L५२५०२ रत्नागिरी ः गॅसने भरलेला अपघातग्रस्त टँकर.


गॅस भरलेल्या टँकरच्या अपघाताने वाहतूक ठप्प
रत्नागिरी, ता. २५ ः जयगड-निवळी मार्गावर तरवळ येथे गॅसने भरलेल्या टँकरला अपघात झाल्यामुळे वाहतूक काही ठप्प झाली होती. या अपघातात चालक जखमी झाला आहे. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. हा अपघात रविवारी (ता. २५) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला.
जिंदाल कंपनीमधून गॅस भरलेला टँकर घेऊन चालक विजय सिंग (वय ३१, कानपूर, उत्तरप्रदेश) हा मुंबईकडे चालला होता. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तरवळ येथे एका छोट्याशा वळणावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. तो रस्त्याच्या शेजारील गटारात जाऊन कोसळला. यामध्ये चालक विजय सिंग याच्या हाताला दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारामुळे जयगड-निवळी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी सुट्टी असल्याने अनेक परजिल्ह्यातील पर्यटक गणपतीपुळेच्या दिशेने चालले होते. त्यांना दुपारी रस्त्यातच ताटकळत राहावे लागले. अपघात घडला त्या ठिकाणापासून दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. गटारात उतरलेला टँकर क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. तीन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. गणपतीपुळेहून निघालेल्या गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या. सुदैवाने गॅसला गळती लागली नव्हती.