रत्नागिरी-घटस्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-घटस्थापना
रत्नागिरी-घटस्थापना

रत्नागिरी-घटस्थापना

sakal_logo
By

- rat२५p३४.jpg-KOP२२L५२५३१ रत्नागिरी ः घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत विक्रीसाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
-------------
जिल्ह्यात आज ३९४ देवींची प्रतिष्ठापना

नवरात्रोत्सव ; देवींच्या मंदिरावर रोषणाई

रत्नागिरी, ता. २६ ः गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवाची धूम सोमवारपासून (ता. २६) गुंजणार आहे. जिल्ह्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुमारे ३९४ सार्वजनिक ७० वैयक्तिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे रास-गरबा नृत्यावर बंधने होती; मात्र यंदा तरुणाई थिरकण्यास सज्ज झाली आहे.
सर्वपित्री अमावास्येच्या मुहूर्तावर रविवारी सकाळच्या सत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे घटस्थापनेवर पावसाचे सावट आहे. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भक्तांनी निःश्‍वास सोडला. सायंकाळी विविध मंडळांनी देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापना करायच्या ठिकाणी वाजतगाजत नेण्यास सुरवात केली होती. पावसाच्या शक्यतेमुळे मोठ्या मिरवणूका निघाल्या नाहीत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीची पूजा करून प्रतिष्ठापना केली जाईल. ठिकठिकाणी मंडप सजलेले आहेत, रोषणाई केली आहे. अनेक मंडळानी स्पर्धा जाहीर केल्या आहेत. या बाजारात विविध प्रकारचे कपडे, दांडिया विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. घरोघरीदेखील घट बसविण्यात येणार असून त्यासाठी सर्वजण तयारी करताना दिसत आहेत. त्यात ओले आणि सुके घट बसवण्याची प्रथा आहे. त्याशिवाय केवळ फोटोची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, चिपळूणची विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषतः महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी येथे गर्दी असते.
---
चौकट
झेंडूचे दर आवाक्यात
महालक्ष्मी पुजनासाठी लागणारी झेंडूची फुले विकणारे विक्रेते रत्नागिरीत दाखल झाले आहे. शहरातील जयस्तंभर परिसरात हे विक्रेते दुकाने थाटून आहेत. यंदा कोल्हापूरमध्ये मोठ्याप्रमाणात पूर येईल एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे झेंडूचे उत्पादन चांगले आले आहे. परिणामी झेंडूचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. किलोला १६० रुपये दर आहे. गतवर्षी हाच दर दोनशे ते तिनशे रुपये होता.