परप्रांतीय कामगारांच्या दोन गटांत ‘फ्री स्टाईल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय कामगारांच्या 
दोन गटांत ‘फ्री स्टाईल’
परप्रांतीय कामगारांच्या दोन गटांत ‘फ्री स्टाईल’

परप्रांतीय कामगारांच्या दोन गटांत ‘फ्री स्टाईल’

sakal_logo
By

परप्रांतीय कामगारांच्या
दोन गटांत ‘फ्री स्टाईल’

बांद्यातील प्रकरण; स्थानिक त्रस्त

बांदा, ता. २५ ः शहरात कट्टा कॉर्नर चौकात काल (ता.२४) रात्री उशिरा परप्रांतीय कामगारांच्या गटात किरकोळ कारणावरून जोरदार ‘फ्री स्टाईल’ झाली. दुपारी घडलेल्या किरकोळ कारणावरून हा वाद रात्री साडेआठच्या सुमारास उफाळून आला. मात्र, याबाबतची कोणतीच तक्रार बांदा पोलिसात देण्यात आली नाही.
स्थानिकांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले. दिवसेंदिवस परप्रांतीय कामगारात रोजच्या रोज होणाऱ्या किरकोळ भाडणाचे रूपांतर मारामारीत होत असल्याने यांना बांदा पोलिसांनी आवर घालावा, अशी मागणी होत आहे. बांदा शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार राहतात. किरकोळ कारणावरून त्यांच्यात रोज भांडणे होत असतात. शनिवारी रात्री सुद्धा तसेच झाले दुपारी झालेल्या किरकोळ वाद शनिवारी रात्री उफाळून आला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्रीच्या वेळी कट्टा कॉर्नर परिसरात झालेल्या या मारामारीची बातमी बांदा शहरात पसरली. त्यावेळी काही स्थानिक सुद्धा धावून गेले मात्र त्यांचा आपापसात वाद असल्याने सुरुवातीला त्याबाबत कोणी विचारणा केली नाही. एका गटाच्या मुकादमलाच चोप देण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले होते. यावेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार चौकात एकत्र आले होते.