भाजपच्या स्वप्नासाठी कटिबद्ध व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या स्वप्नासाठी कटिबद्ध व्हा
भाजपच्या स्वप्नासाठी कटिबद्ध व्हा

भाजपच्या स्वप्नासाठी कटिबद्ध व्हा

sakal_logo
By

फोटो ः किमान तीन कॉलम

52549
हिर्लोक ः येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केल्यानंतर मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)


भाजपच्या स्वप्नासाठी कटिबद्ध व्हा

राजन तेली यांचे आवाहन; हिर्लोक येथे ‘मन की बात’ कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः आता शतप्रतिशत भाजपचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहूया आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देऊया. हीच खरी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली असेल, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
एकात्म मानववादाचे प्रणेते प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीदिनी आणि प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सेवा पंधरावडा’ अंतर्गत भारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुक्यातर्फे हिर्लोक बूथ कमिटी १६० येथे ‘मन की बात’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष तेली, उत्तर भारतीय मोर्चा प्रवक्ता-महाराष्ट्र प्रदेशचे डॉ. अमित त्रिपाठी, ओमप्रकाश त्रिवारी, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, हिर्लोक हायस्कूल अध्यक्ष उदय सावंत, प्रदेश सदस्य राजू राऊळ, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, तालुकाध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस भाई बेळणेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्या तवटे, रुपेश कानडे, तालुकाउपाध्यक्ष पप्पू सावंत, राजा धुरी, महिला मोर्चा पदाधिकारी रेखा काणेकर, प्रज्ञा राणे, माजी सभापती नूतन आईर, शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत नाईक, नागेश परब, बूथ अध्यक्ष पंढरी शिर्के, सरपंच नागेश आईर, अवधूत सामंत, रमेश घोगळे, पंढरी सावंत आदी उपस्थितीत होते.
---
पुस्तके भेट देऊन स्वागत
बूथ अध्यक्ष शिर्के आणि शक्तिकेंद्र प्रमुख नाईक यांनी मान्यवरांचे पुस्तक भेट देत स्वागत केले. यावेळी डॉ. त्रिपाठी यांनाही भारत देश सशक्त भारत करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकजुटीने कामाला लागूया, असे आवाहन केले.