
दोन ठिकाणच्या अपघातात आठ जखमी
दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जखमी
सावंतवाडीत उपचार; आकेरी, दाणोलीतील घटना
सावंतवाडी, ता. २५ ः आकेरी व दाणोली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तब्ब्ल आठ जण जखमी झाले. जखमींना एकाच वेळी कुटीर रुग्णालयात दाखल केल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
यातील एक अपघात हा आकेरी तिठा येथे दोन दुचाकीत घडला. पादचारी महिलेला बाजू देताना हा अपघात झाल्याचे संबधितांचे म्हणणे आहे तर दुसरा अपघात दाणोली येथे दुचाकी व मोटारीत झाला. या अपघातात तीघे जखमी झाले. शंकर आत्मारात राउळ (वय ३०), नीलेश एकनाथ सावंत (वय ३२ दोघे रा. शिरशिंगे), संदेश सत्यवान नाईक (वय २९ रा. झाराप), पार्वती व्यकप्पा गाडेकर (वय ५२), अनंत सीताराम चव्हाण (वय ४०), अशी आकेरी येथील अपघातात जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथिल कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यातील तिघांना अधिक उपचारासाठी गोमेकॉमध्ये हलविले. अधिक माहिती अशी की, यातील एक दुचाकीस्वार कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने येत होता तर दुसरा दुचाकीस्वार सावंतवाडीहून नेमळेच्या दिशेने जात होता. यावेळी अचानक मध्ये महिला आल्याने हा अपघात घडला, असे सांगण्यात आले. याबाबतची माहिती पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी दिली; मात्र, नेमका अपघात कसा घडला? याचा तपास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील कुटीर रुग्णालयात वैदयकीय अधिकारी मुरली चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. तर अपघात झाल्याचे कळताच संबधितांच्या गावातील लोकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दुसरा अपघात दाणोली येथे कार व दुचाकी यांच्यात घडला. यात तिघे जण कीरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.