लिंगाधारीत समनतेला घरातूनच सुरुवात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगाधारीत समनतेला घरातूनच सुरुवात करा
लिंगाधारीत समनतेला घरातूनच सुरुवात करा

लिंगाधारीत समनतेला घरातूनच सुरुवात करा

sakal_logo
By

52669
कणकवली : गोपुरी आश्रमातील शिबिरात मार्गदर्शन करताना कवयित्री सरिता पवार.

लिंगाधारीत समनतेला घरातूनच सुरुवात करा

सरिता पवार : गोपुरी आश्रमात संविधानिक मूल्यांचा जागर

कणकवली, ता.२६ : स्त्री आणि पुरुष या दोघांनीही माणुसपणाच्या व्याख्येत जगणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुषांसोबत तृतीयपंथीनाही समाजात समान न्याय मिळायला हवा. तसेच लिंगाधारीत समानतेची आपल्या घरातूनच सुरुवात करा, असे आवाहन कवयित्री सरिता पवार यांनी केले.
अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीमच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी आश्रम वागदे येथे नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर या दोन दिवसीय निवासी शिबिराचा समारोप झाला. यावेळी पवार बोलत होत्‍या. यावेळी ॲड. प्राजक्ता शिंदे, कुंभवडे तलाठी श्रीया शिंदे, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर आणि साद टीम कणकवलीचे समन्वयक श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते.
गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वात कशा प्रकारे सकारात्मक बदल घडत जातात याविषयी मार्गदर्शन केले. ॲड. स्वाती तेली यांनी ‘संविधान ओळख-चर्चा’ या सत्रात संविधानाची संपूर्ण ओळख, कायदे निर्मिती प्रक्रिया याविषयी शिबिरार्थींशी संवाद साधला. साद टीम सदस्य विशाल गुरव, नेहरू युवा केंद्राचे अक्षय मोडक, सिद्धेश कदम यांनीही मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वितेसाठी जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, श्रद्धा पाटकर, श्रेयश शिंदे, जयराम जाधव, सुजय जाधव, विशाल गुरव, अक्षय मोडक, वृदाली हजारे, प्रियांका मेस्त्री, निशा कांबळी, विल्सन फर्नांडिस, बाबू राणे, अमोल सावंत यांनी मेहनत घेतली.