सदर ः माझी आनंदी शाळा लाविते लळा

सदर ः माझी आनंदी शाळा लाविते लळा

२६ डिसेंबर चे पान ८ दैनिकवरुन लोगो व लेखकाचा फोटो घेणे...

फोटो ओळी
-rat१p३.jpg ः डॉ. गजानन पाटील
------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल


अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही पाहतो की, शाळा आनंददायी व्हाव्यात म्हणून राज्य सरकार, केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. अलीकडच्या काळात शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून काही शाळा खूप आनंददायी झाल्याही; पण सर्व शाळा खरंच आनंददायी झाल्या का? हा संशोधनाचा विषय आहे. मुळात मूल शाळेत आनंदाने आलं पाहिजे, आनंदाने शिकले पाहिजे आणि टिकलं पाहिजे. ते जे आनंदाने शिकतो त्याचा वापर समाजात त्यांनी केला पाहिजे, अशी आनंददायी शाळेची संकल्पना आहे; पण परीक्षा पद्धतीवर भर देणाऱ्या आपल्या अभ्यासक्रमामुळे मुलाला शाळेत आनंद वाटत नाही. शिकलेले पाठ करावं, पाठ केलेले परीक्षेत लिहावं, पैकीच्या पैकी मार्क मिळवावेत. एवढीच माफक अपेक्षा ठेवून पालकांनी मुलाला शाळेत घातलेलं असतं. हे वास्तव सत्य जरी मनाला अस्वस्थ करून टाकणार असलं तरी ते विदारक सत्यच आहे. यावर अनेक तज्ञ मंडळींनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या विचार केला. काही लोक यशस्वी झाले; पण तेवढ्यापुरतेच. पुढे ''येरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या'' अशी स्थिती झालेली आहे.

- डॉ. गजानन पाटील
-----------------
माझी आनंदी शाळा लाविते लळा

सन २००९-१० या शैक्षणिक वर्षात डाएट रत्नागिरीने आनंददायी शाळा हा उपक्रम राबवला. रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यातील ९ शाळांमध्ये हा अनोखा उपक्रम राबवला. त्या त्या केंद्रांचे केंद्रप्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि त्या गावचे पालक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून शाळा कशा आनंददायी करता येतील यावर भर दिला. तीनही तालुक्यातील ९ शाळांनी अल्पावधीत शाळेचे रूपडे पालटले. बोलक्या भिंती, बोलके व्हरांडे, बोलक्या फरशा तयार झाल्या. ज्ञानरचनावादावर भर देऊन शाळेला वेगळे रूप दिले गेले. त्या वेळी माझ्यासह डाएटचे प्रा. सलगर, प्रा. शिवलकर, प्रा. कामशेट्टी आणि प्रा. दीपा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांचा शैक्षणिक उठाव करण्यात आला.
शिक्षक, मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून आणि समाज सहभागातून शाळांची रंगरांगोटी करण्यात आली. शाळांचे अध्ययन कोपरे सजले. एवढेच नाही तर शाळेच्या संरक्षण भिंतीपासून आतला सारा परिसर आनंददायी केला. यामध्ये संतोष आयरे गुरूजी यांच्या कल्पक विचारातून साकारलेले अनेकविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सगळं गाव शाळा झाले. सगळी शाळा गाव बनले. ''आनंदी शाळा लाविते लळा'' हे घोषवाक्य घेऊन मूलं आनंदाने शाळेत स्वतः शिकू लागली. मुलांच्या लेखन वाचनात प्रगती दिसू लागली. मुलं स्वअभिव्यक्ती सरस होऊ लागली. पालकसभेच्या माध्यमांतून पालकांना प्रेरित करण्याचे काम केले. पालकांना शाळेचे महत्व पटू लागले. पालक आपल्यापरीने शाळेसाठी मदत करू लागले. त्यातून मुलांच्या स्वयंअध्ययनाला एक वेगळे वळण लागले. मुलांच्या आनंदाला नुसते उधाण आलेले. या उपक्रमांतर्गत सर्व कार्यक्रमांचे आम्ही टप्पेनिहाय चित्रीकरण केले. पुढे त्याचा एक माहितीपट तयार केला. ''माझी आनंदी शाळा लाविते लळा'', शासनाचा एक रुपया खर्च न करता हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेला.
बघता बघता या उपक्रमाचे राज्य व केंद्र स्तरावर सादरीकरण झाले. कौतुक झाले. पुढे २०१५ मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रमध्ये हा उपक्रम थोडा बदल करून संपूर्ण राज्यभरातील शाळांमध्ये राबवला गेला. त्यानंतर आता आदर्श शाळेच्या रूपात पुन्हा नव्याने साकारत आहेत. आजही असं वाटतं की, शाळा आनंददायी करायच्या असतील तर शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, क्षेत्रिय अधिकारी यांना प्रेरित करायला हवे. ते प्रेरित करण्याचे काम जिल्हास्तरावर डाएट व राज्यस्तरावर एससीईआरटी करते. ते काम जर प्रभावीपणे झाले तर कदाचित राज्यातील प्रत्येक शाळा आनंददायी होतील. शाळा आनंददायी झाल्या की, मुलं आनंदाने शिकतील. शाळा, परिसर, शिक्षक, मुख्याध्यापक आणि मुले आनंददायी असतील तर आनंददायी शिक्षण घडेल. मग आता जे चित्र दिसते ते शाळेला जाताना मुलं पाय ओढत चालतात नि शाळा सुटल्यावर आनंदाने नाचतात. या उलट मुलं शाळेत येताना आनंदाने यावीत नि जाताना त्याचे पाय शाळेतून निघू नयेत, अशी आनंददायी शाळा असावी.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com