मंडणगड -जाखडी स्पर्धेत तुळशी नाच मंडळ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड -जाखडी स्पर्धेत तुळशी नाच मंडळ प्रथम
मंडणगड -जाखडी स्पर्धेत तुळशी नाच मंडळ प्रथम

मंडणगड -जाखडी स्पर्धेत तुळशी नाच मंडळ प्रथम

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat1p27.jpg -KOP23L72494 भिंताड: जाखडी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या भैरवनाथ नृत्य कला पथक तुळशी गणेशवाडी या नृत्य संचाला सन्मानित करताना आयोजक मंडळाचे सर्व पदाधिकारी.
-rat1p28.jpg-KOP23L72495 रात्रभर रंगलेल्या जाखडी नृत्याचा जागर पाहण्यासाठी रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
---------------

जाखडी स्पर्धेत तुळशी नाच मंडळ प्रथम
शहिरी कला मंडळ ; व्दितीय क्रमांक मूर, तृतीय करंजखोलला
मंडणगड,ता.२ःकलगी तुरा सांस्कृतीक शाहिरी कला मंडळ रायगड रत्नागिरी यांच्या वतीने माणगाव तालुक्यातील भिंताड येथे 29 डिसेंबरला पार पडलेल्या आलेल्या जिल्हास्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेत भैरवनाथ नृत्य कलापथक तुळशी गणेशवाडी यांना प्रथम क्रमांक पटाकाविला. तर व्दितीय क्रमांक हनुमान नृत्य कला पथक मुर, तृतीय क्रमांक अमर नृत्य कलापथक करंजखोल यांनी मिळवीला.
कोकणात प्रसिध्द असणाऱ्या गौरी गणेश जाखडी नृत्य या कला प्रकाराला प्रोत्साहन मिळावे तसेच पंरपरागत जोपासण्यात आलेली ही लोककला वृध्दींगत व्हावी त्यातून नवशाहिरांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मंडणगड महाड माणगाव पोलादपूर कोलाड या तालुक्यातील आठ संघानी सहभाग घेतला. गण गौळण पद या काव्य प्रकाराच्या माध्यमातून आध्यात्मिक पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर काव्य सादर करताना शाहिरांनी स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर वाढवित नेली. नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी ढोलकीच्या ठेक्यावर जोषपुर्ण व स्पर्धेच्या नियमाला अनुसरुन नृत्याचे सादरीकरण करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. परिक्षकांनी ॉत्यातील बारकावे अचूक टिपत सहभागी शाहीर कलावंताना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत उत्कृष्ट शाहिराचा पुरस्कार भैरी जोगेश्वरी कलामंच शेनाळे या संघाचे शाहीर सुनील साळवी यांना मिळाला. तर उत्कृष्ट ढोलकी वादनाचा पुरस्कार भैरवनात नृत्य कालापथक तुळशी गणेशवाडीच्या तनिष मोगरे याने पटकाविला. स्पर्धेत चर्तुथ क्रमांकासाठी समान गुण प्राप्त झाल्याने चुरस निर्माण झाली. यामध्ये मानाईदेवी नृत्य कला पथक सव व भैरी जोगेश्वरी कला मंच शेनाळे यांना विभागून देण्यात आला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक ढाल, प्रमाणपत्र, ढोलकी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख सरपंच म्हणून मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंभे, वामन बैकर, अंकुश जाधव, सहदेव उतेकर, रामदास वारीक, रामचंद्र म्हात्रे, प्रल्हाद शिरशिवकर, किसन बाटे, नथुराम धामणे, शंकर तुरडे, जयदास खेराडे यांनी काम पाहिले.